आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीआय कार्यकर्त्यावर पैठणला प्राणघातक हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पैठण - तालुक्यातील दावरवाडी येथील उपसरपंच, शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर कचरू सरोदे यांच्यावर शहरातील प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या आवारात सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला. या मारहाणीत सरोदे यांच्या डोक्याला,  पायाला, तोंडाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात पंचायत समितीच्या दोन अधिकाऱ्यांवर फिर्यादीत संशय व्यक्त करण्यात आला आहे.   

सरोदे हे तालुक्यात आरटीआय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयांत आरटीआय दाखल केलेले आहेत.  चार महिन्यांपूर्वी पंचायत समितीतील बहुचर्चित पाणी टँकर घोटाळ्याची माहिती  मागितली आहे. सरोदे यांना उपरोक्त माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली नसून सरोदे यांनी अर्ज परत घ्यावा यासाठी दबावतंत्र आणल्याचे बोलले जात आहे. सोमवारी दुपारी  ३ च्या सुमारास तोंडाला काळी पट्टी बांधलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी सरोदे यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला  “ही घे माहिती’ असे म्हणत सरोदे यांच्यावर हल्ला केला. 
बातम्या आणखी आहेत...