आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्ड बदलून एटीएममधून वृद्धाचे 76 हजार लांबवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- एटीएममधून पैसे काढून देण्यासाठी मदत करण्याचा बनाव करून  वृद्धाच्या बँक खात्यातून ७६ हजार ५०० रुपये काढून घेतल्याची घटना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्टेशन रस्त्यावरील एटीएम केंद्रावर घडली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना ६ ऑगस्ट रोजी घडली. तालुक्यातील सवंदगाव येथील रहिवासी दुर्योधन कचरू धुळे हे ६ ऑगस्ट रोजी कामानिमित्त शहरात आले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्टेशन रस्त्यावरील एटीएम केंद्रात ते पैसे काढण्यासाठी गेले. त्या वेळी एका अज्ञात व्यक्तीने एटीएममधून पैसे काढून देतो, असे सांगत धुळे यांच्याकडून त्यांचे एटीएम कार्ड घेतले. या वेळी त्याने हातचलाखी करून एटीएम कार्डची अदलाबदल केली व धुळे यांच्या खात्यातून ७६ हजार ५०० रुपये काढले. त्यानंतर धुळे यांना मोबाइलवर मेसेज आला, परंतु त्याचा अर्थ न समजल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतर खात्यातून रक्कम कमी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...