आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एका समाजाला खुश करण्यासाठी अॅट्राॅसिटी कायद्याशी खेळ नको’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
औरंगाबाद - मुख्यमंत्र्यांनी अॅट्राॅसिटी कायद्याशी कोणताही खेळ खेळू नये, अन्यथा आंबेडकरवादी जनता त्यांना माफ करणार नाही, असा इशारा फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेचे मार्गदर्शक अॅड. रमेशभाई खंडागळे यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी याविषयी केलेल्या विधानाचा परिषदेच्या बैठकीत निषेध करण्यात आला. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईमध्ये मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करताना, "अॅट्राॅसिटीचे गुन्हे थेट दाखल करणार नाही, तर प्रथम समितीसमोर तक्रार जाईल. समितीने दिलेल्या निर्णयानंतरच गुन्हा दाखल करायचा की नाही ठरवण्यात येईल’, असे म्हटले होते. त्यांच्या या विधानाचा परिषदेने निषेध केला आहे. मराठा समाजाला खुश करण्यासाठी दलित आणि आदिवासींच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. 
 
हा कायदा केंद्राने केला असून समिती नेमून शहानिशा करूनच तक्रार नोंदवावी, अशी त्यात कोणतीही तरतूद नाही. उलट गुन्हा नोंदवण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर त्याच्यावरही गुन्हा नोंदवण्याचे निर्देश आहेत. मग मुख्यमंत्री कायद्याची अशी मुस्कटदाबी कशी करू शकतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असाही सूर या बैठकीत निघाला. 
 
हा कायदा गोरगरीब, पददलितांच्या संरक्षणाचे कवच आहे. समितीच्या नावाखाली कवच काढून घेण्यात येत असेल तर दलित, आदिवासी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. समितीमध्ये आमचे प्रतिनिधी नसल्यामुळे दलितांची बाजू कोण घेईल? मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला काय द्यायचे ते ठरवावे; पण एससी, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये, असा इशारा या बैठकीत देण्यात आला. 
 
या बैठकीला भीमराव सोनवणे, संभाजी साबळे, मधुकर घोरपडे, कबीरानंद राजहंस, ओमपाल चावरिया, एस.एस. जमधडे, लक्ष्मण जाधव पाटील, संजय चिकसे, हिरालाल मगरे, माणिक पगडे, अशोक जगधने, मंगल प्रधान, रमेश भोळे, दिनकर मगर, साईनाथ उगम, विजय दाभाडे, दादाराव मगरे, कैलास भोसले उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...