आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोड: कुक्कुटपालन केंद्रात मोकाट कुत्र्यांचा कोंबड्यांवर हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुत्र्यांनी कुक्कुटपालन केंद्रावर हल्ला करून शेकडो कोंबड्यांचा खात्मा केल्याने शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन  हिरावले.कुत्र्यांनी कुक्कुटपालन केंद्रावर हल्ला करून शेकडो कोंबड्यांचा खात्मा केल्याने शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन  हिरावले. - Divya Marathi
कुत्र्यांनी कुक्कुटपालन केंद्रावर हल्ला करून शेकडो कोंबड्यांचा खात्मा केल्याने शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावले.कुत्र्यांनी कुक्कुटपालन केंद्रावर हल्ला करून शेकडो कोंबड्यांचा खात्मा केल्याने शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावले.
सिल्लोड  - कुत्र्यांनी कुक्कुटपालन केंद्रावर हल्ला करून शेकडो कोंबड्यांचा खात्मा केल्याने शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन  हिरावल्याची घटना तालुक्यातील टाकळी खुर्द येथे घडली.  
टाकळी खुर्द तालुका सिल्लोड येथील शेतकरी जाहेद खान रशीद खान यांनी शेतात सुरू केलेल्या कुक्कुटपालन केंद्रावर बुधवारी मध्यरात्रीनंतर गावातील मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवल्याने शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. शेतकरी जाहेद खान रशीद खान नेहमीप्रमाणे गुरुवार, दि. ४ रोजी सकाळी ते शेतात दूध आणण्यासाठी गेले असता त्यांच्या कुक्कुटपालन  केंद्रातील एक हजार दोनशे कोंबड्या जखमी अवस्थेत  दगावल्याचे त्यांना दिसले. झालेल्या प्रकाराने हादरून गेलेल्या जाहेद खान यांनी पाहणी केली असता गावातील मोकाट कुत्र्यांनी उच्छाद घालून कोबड्या मारल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले असून मेहनीतीने उभा केलेला व्यवसाय संपल्याने  ते खचून गेले आहेत. 
 
त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनच मोकाट कुत्र्यांमुळे एका रात्रीत नष्ट झाले. घटनेची  माहिती गावचे तलाठी गिरीश झाल्टे यांना कळवण्यात आली असून त्यांनी नोंद घेतली आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या काही दिवसांपासून  गावात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला आहे.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...