आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्ता करासाेबतच पाणीपट्टी नोटिसा, अायुक्तांनी सर्वसाधारण सभेतही केले कबूल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने नळधारकांचे रेकॉर्ड दिले नाही म्हणून गेल्या पाच महिन्यांपासून हातावर हात धरून बसलेले पालिका प्रशासन अखेर जागे झाले अाहे. जुन्या रेकॉर्डवरून नवीन रेकॉर्ड तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता नागरिकांना मालमत्ता कराबरोबरच पाणीपट्टीचीही नोटीस मिळणार आहे. या नोटिसा नेमक्या कधी मिळण्यास सुरुवात होतील, हे मात्र अजून स्पष्ट नाही. 
 
कंपनीने रेकॉर्ड दिले नसले तरी मनपाकडील जुन्या रेकॉर्डवरून पालिका नळधारकांना नोटिसा देऊ शकते आणि थकलेले ५० कोटी रुपये वसूल करू शकते, हे ‘दिव्य मराठी’ने समोर आणले होते. त्यानंतर जुन्या रेकॉर्डवरून नवे रेकॉर्ड तयार करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत सांगितले.
 
 पोलिसांकडे अर्ज केला तरी कंपनीने आम्हाला नळधारकांचे अद्ययावत रेकॉर्ड दिले नाही, परंतु आता आम्ही जुन्या रेकॉर्डवरून नोटिसा तयार करण्याचे काम हाती घेतले असल्याचे सभागृहाला सांगितले.
 
 गतवर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत पाणीपट्टीपोटी पालिकेकडे ५५ कोटी रुपये जमा झाले होते. यंदा दहा टक्के नैसर्गिक वाढ लक्षात घेता हा आकडा ६० कोटींपुढे पुढे जाणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. यंदा कोटी रुपयांचीच वसुली झाल्याची कबुली बकोरिया यांनीच दिली होती.
 कंपनीने यादी दिल्याने आम्ही वसुली करू शकत नाही, असे ते म्हणाले होते. परंतु पालिका कंपनीच्या भरवशावर बसता स्वत: जुन्या दस्तऐवजांच्या आधारे नवीन यादी तयार करू शकते, हे ‘दिव्य मराठी’ने स्पष्ट केले होते. त्यानंतर प्रशासनाने जुन्या रेकॉर्डच्या मदतीने नोटिसा देण्याचे काम हाती घेतले.
 
 हेच काम जर प्रशासनाने पाच महिन्यांपूर्वीच केले असते तर आतापर्यंत पाणीपट्टीची वसुली ५० कोटींपर्यंत पोहोचली असती. विलंबाने का होईना पालिका प्रशासनाला जाग आल्याने मार्च महिन्यात पाणीपट्टीची वसुली वाढणार आहे.
 
तिमाही नोटिसांची सूचना 
पाणीपट्टीच्या नोटिसा तयार करणे सुरू झाले आहे. त्यामुळे आता मालमत्ता करासोबतच त्या नागरिकांना दिल्या जातील. त्याचबरोबर वर्षातून एकदाच नोटीस देण्याऐवजी तिमाहीचे बिल तयार करून नोटिसा देण्यात याव्यात, जेणेकरून नागरिकांना रक्कम भरणे सोपे जाईल, अशी सूचना सदस्यांनी केली. भविष्यात महिन्याला कर भरता यावा, असे नियोजन करावे, अशीही सूचनाही पुढे आली असून त्या दिशेने विचार सुरू असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...