आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंट्रोल रूममधून यंग चार्लींवर असे करणार नियंत्रण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात एखादी घटना घडली, मंगळसूत्र पळवले किंवा अपघात झाला तर कंट्रोल रूमच्या १०० किंवा २२४०५०० या क्रमांकावर फोन करावा. नियंत्रण कक्षाकडून त्या परिसरात यंग चॉर्ली कोठे आहेत, याचा संगणकावर शोध घेतला जातो. जे घटनेच्या जवळ आहेत, त्यांना वॉकी-टॉकीवरून संदेश दिला जातो अन् अवघ्या काही मिनिटांत यंग चॉर्ली घटनास्थळी पोहोचतात. ही कार्यपद्धती आहे शहराच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या १५२ चार्ली कमांडोंची.
असे केले जाईल काम...
1. यंग चार्ली विविध भागांत २४ तास फिरत राहणार आहेत. रस्त्यावर किंवा एखाद्या भागात गुन्हा घडत असल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्याचे काम ते करतील.
2. रस्त्यावर मंगळसूत्र चोरीची घटना घडली, तर फोन करून नियंत्रण कक्षाला १०० किंवा २२४०५०० या क्रमांकावर माहिती कळवता येते. त्यानंतर यंत्रणा कामाला लागेल.
3. मंगळसूत्र चोरीची घटना घडल्यानंतर दक्ष नागरिकांचा पोलिस नियंत्रण कक्षाला फोन गेल्यावर पोलिस लगेच कामाला लागतात. जीपीएस यंत्रणेद्वारे कोणता चार्ली कुठे आहे याची माहिती मिळवली जाते आणि त्याप्रमाणे पुढील कारवाईसंबंधी नियंत्रण कक्षातून सूचना केल्या जातात.
4. चार्लींना वॉकी-टॉकी देण्यात आली आहे. शिवाय दुचाकींवर जीपीआरएस यंत्रणा आहे. १५३ कर्मचाऱ्यांपैकी कोणता चॉर्ली कोठे आहे याची माहिती घेऊन घटनास्थळापासून जवळ असलेल्या चार्लीला तत्काळ रवाना केले जाते. त्यानंतर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी चार्ली सज्ज होतात.
5. नियंत्रण कक्षातून मिळालेल्या सूचनेनुसार चार्ली अवघ्या काही मिनिटांतच घटनास्थळावर पोहोचतात. घटनेची माहिती घेऊन चोरट्यांचा पाठलाग सुरू होतो.
6. मंगळसूत्र चोरट्यांची माहिती घेतल्यानंतर परिसरात गस्त घालून दुचाकीचालकांवर नजर ठेवली जाते. चोरटे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांचा पाठलाग करण्यात येतो.
7. घटना घडल्यानंतर बिलकुल वेळ दवडता चार्ली तत्काळ कामाला लागतात म्हणून चोरट्यांना पसार होण्याची संधी मिळत नाही. तत्परतेमुळे चोरट्यांना जेरबंद करणे सहज शक्य होते. चार्लीने काही गडबड केल्यास त्याची तक्रार पोलिस नियंत्रण कक्षात करता येईल.
8. पोलिस आयुक्तांच्या दालनात जीपीआरएसद्वारे सर्वांवर नजर ठेवण्यासाठी संगणकावर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्या पोलिस ठाण्याचे अधिकारी कोठे आहेत, कोणती मोबाइल व्हॅन कोठे फिरते ही माहिती आयुक्तांना आणि नियंत्रण कक्षाला मिळते.