आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे रसिक आगळेवेगळेच !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबादचेरसिक आगळेवेगळेच आहे. मराठी रंगभूमीविषयी त्यांना अतिशय आपुलकी आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर प्रयोग सादर करण्याची मौज काही वेगळीच असल्याचे प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांनी सांगितले.
औरंगाबाद आणि निखळ विनोदाची हातोटी असलेल्या प्रशांत यांचे घनिष्ठ नाते आहे. येथील अनेक रसिकांशी त्यांचे मित्रत्व आहे. त्यांच्या नाट्य प्रयोगांना येथे प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यामुळे येथील रसिक कायम माझ्या जवळचा असल्याचे त्यांनी सांिगतले. आता ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाच्या निमित्ताने शनिवारी प्रशांत दामले हे पुन्हा एकदा औरंगाबादच्या रसिकांना भेटणार आहेत. दामले यांच्याबराेबर या नाटकात तेजश्री प्रधानची प्रमुख भूमिका आहे. १८ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या वडिलांना पाहण्याच्या इच्छेपोटी त्यांची मुलगी त्यांना शोधत सोलापूरहून मुंबईला येते आणि सुरुवातीला वडिलांना नकोशी वाटणारी ही मुलगी दोन आठवड्यांच्या कालावधीतच वडिलांच्या काळजात कशी घुसते, त्याची ही कथा. कालिदास कान्हेरे (प्रशांत दामले) आणि कांचन (तेजश्री प्रधान) ह्यांच्या हळुवार नात्याची ही कथा, प्रेक्षकांचे मनोरंजन करते. काही वर्षांपूर्वी हे नाटक जेव्हा रंगभूमीवर आलं होतं. तेव्हा अभिनेत्री स्वाती चिटणीस कांचनच्या भूमिका साकारत होत्या. त्याविषयी तेजश्री प्रधान यांनी सांगितले की, हे नाटक करण्यापूर्वी मी यू-ट्यूबवर स्वाती मावशीचं नाटक पाहिलं होतं. त्यानंतर तिला फोन करूनही सांगितलं होतं की, मावशी तुझी भूमिका मी करतेय.