आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवे तर 75 लाख घ्या, पण माझे अधिकार सांगा, औरंगाबाद जिल्हापरिषद सभापतींचा त्रागा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हापरिषद महिला बालकल्याण विभागाला अत्यल्प निधी मिळतो. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकासकामे निधीचा परस्पर निर्णय घेऊन मोकळे होत आहेत. विचारणा केली तर केवळ ७५ लाख रुपये मिळतात, यातून गोरगरिबांच्या मदतीसाठी काही देता येत नाही, असे सांगतात. मीच तुम्हाला ७५ लाख रुपये देते, माझे अधिकार काय तेवढे सांगा, असा संताप बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत समिती सभापती कुसुम लोहकरे यांनी व्यक्त केला. 

जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा मुद्दा उपस्थित होताच महिला बालकल्याण समिती सभापती कुसुम लोहकरे यांनी अचानक माइक हातात घेत ‘हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कदम मला विचारता परस्पर काम करत आहेत. हेच होणार असेल तर मग सभापतिपद काय कामाचे? विकासकामे होणार नसतील तर समिती ठेवताच कशाला? परस्पर निर्णय घेता, मग माझे काम काय? माझे अधिकार काय? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी मीच तुम्हाला ७५ लाख रुपये देते; पण माझे अधिकार सांगा,’ असे उद्विग्न उद््गार काढले. 
बातम्या आणखी आहेत...