आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मारहाणीनंतर घाटीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- घाटीत शनिवारी निवासी डॉक्टरला मारहाण झाली आणि त्याच दिवशी रात्री वॉर्ड न. १८ मध्ये कार्यरत असलेले ब्रदर प्रदीप माने यांना मारहाण झाली. यानंतर घाटीच्या सुरक्षा कंपनीसह इतर काही बदल करण्याविषयी सोमवारी अधिष्ठाता कार्यालयात महत्त्वाची बैठक झाली. या वेळी अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह शासकीय परिचारिका संघटनेचे पदाधिकारी, मार्डचे पदाधिकारी आणि चतुर्थश्रेणी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
रुग्णसेवेचा प्रचंड व्याप असलेल्या घाटीत सेवा देताना डॉक्टर्स आणि ब्रदर यांना मारहाणीच्या घटना घडत आहेत. यामुळे मार्ड तसेच परिचारिका संघटनेने संपाचा इशारा दिला होता. याचा सर्वाधिक परिणाम रुग्णांवर होणार आहे. या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलायला हवीत, अशी एकमुखी मागणी संघटनांनी केली आहे.
मार्डनेही सुरक्षा यंत्रणा बदलण्याची केली मागणी :बालरोग विभागात कार्यरत असलेले निवासी डॉ. राकेश चिकलोंडे यांना मारहाण झाल्यानंतर निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीनेही सुरक्षा रक्षक यंत्रणा मेस्को बदलण्यात यावी, अशी मागणी केली होती. डॉक्टर- रुग्णांत मारामारी सुरू असताना सुरक्षा रक्षक मदतीला येण्याऐवजी पळून गेले होते.
आरोपीला शिक्षा न झाल्यास काम बंद
- ब्रदर माने यांची काहीही चूक नसताना त्यांना मारहाण झाली. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आरोपीला अटक आणि योग्य शिक्षा होणे अपेक्षित आहे. प्रशासनाला आम्ही आजपर्यंतची मुदत दिली आहे. त्यांनी आरोपीला अटक करावी. तसे न झाल्यास आम्ही काम बंद करणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे रुग्णांचे हाल होतील, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, प्रशासनानेही या बाबींची दखल घेणे गरजेचे आहे.
इंदुमती थोरात, सचिव, शासकीय परिचारिका संघटना
संघटनांच्या या मागण्या
- रुग्णांना भेटीच्या वेळा निश्चित करा, त्याची काटेकोर अंमलबजावणी करा.
- घाटीमध्ये प्रवेशासाठी एकच गेट असावे.
- सुरक्षा यंत्रणा तत्काळ बदलावी.