आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: अशी होते भाजीपाला-फळांची आवक, आडते मालामाल शेतकऱ्यांची रोज 5 लाखांची लूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- येथील जाधववाडी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आडतीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून रोज सुमारे पाच लाख रुपये बेकायदा वसूल केले जातात. डिसेंबर २०१४ मध्ये आडतमुक्ती झाली. आडतमुक्ती झाल्यापासून ते आजपर्यंत केवळ एकदाच एका आडत्यावर बाजार समितीने कारवाई करून एक हजार रुपये दंड वसूल केला. विशेष म्हणजे नियमानुसार प्रत्येक वर्षी लेखापरीक्षणापूर्वी बाजार समिती प्रशासनाने सर्व आडत्यांची खाते तपासणी करणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही खाते पासणीही झाली नाही. अशा पद्धतीने सातत्याने दुर्लक्ष केल्यानेच आडत्यांचे फावते आणि शेतकऱ्यांची लुबाडणूक होते. 
 
आडत मुक्तीनंतरही आडतीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून दहा टक्क्यांनी रक्कम वसूल केली जात असल्याचा प्रकार डीबी स्टारने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणला. आपल्या आवारात आडते बिनधास्तपणे शेतकऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करत असतानाही बाजार समिती प्रशासनाला त्याचा थांगपत्ताही लागू नये, हे उलगडणारे कोडे आहे. 
 
रोज ५० लाखांचा व्यवहार 
बाजार समितीमध्ये रोज ४० ते ५० लाख रुपयांचे धान्य, फळे, भाजीपाला इतर भुसार माल विकला जातो. या रकमेच्या दहा टक्के म्हणजे पाच लाख रुपयांची रोज आडत वसूल केली जात आहे. तीही शेतकऱ्यांकडून. येथे रोज औरंगाबाद जिल्ह्यासह नगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतीमाल विक्रीसाठी आणतात. 
 
काय सांगतो नियम? 
आडत म्हणजे एक प्रकारचा सेवाकर आहे. हा सेवाकर शेतकऱ्यांऐवजी खरेदीदार व्यापाऱ्यांककडून वसूल करावा, असा निर्णय २० डिसेंबर २०१४ झाला. फळे, भाजिपाल्यासाठी टक्के, तर धान्य भुसार मालासाठी टक्के आडत खरेदीदार व्यापाऱ्याकडून वसूल करावा, असा नियम आहे. 
 
तीन वर्षांत खाते तपासणी नाही 
प्रत्येक आडत्याचे खाते पुस्तक असते. या खातेपुस्तकाची तपासणी केल्यास सर्व व्यवहारांची माहिती मिळते. नियमानुसार दरवर्षी लेखापरीक्षण होण्याअगोदर बाजार समितीने खाते तपासणी केली पाहिजे. पण, तीन वर्षांत एकदाही खातेतपासणी झाली नसल्याने आडत्यांच्या व्यवहारावर कुठलाही अंकुश राहिला नाही. खाते तपासणी झाल्यास कोणत्या आडत्याने आडतबंदीनंतर किती आडत वसूल केली, याचा अंदाज येईल आणि त्यानुसार कारवाई करता येईल. बाजार समितीमध्ये रोज धान्य, भाजीपाला आणि फळांची अशी आवक होते. त्यातच आडत वसुली केली जाते. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, शेतकरी, व्यापारी, अधिकारी यांच्या प्रतिक्रिया...
शेवटच्या स्लाइडवर व्हिडिओ...
 
हे पण वाचा... 
बातम्या आणखी आहेत...