आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनशताब्दीचे कमी झाले १५ किमी अन् वाढला ६५ किमीचा पल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मध्य रेल्वेच्या जनशताब्दी एक्स्प्रेसचा २०१२ मध्ये दादर ते छत्रपती शिवाजी टर्मिनस असा पंधरा किमीचा पल्ला घटवला, तर दुसरीकडे औरंगाबाद ते जालना हे विरुद्ध दिशेने ६५ किमीचे अंतर वाढवण्यात आले आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जालन्याप्रमाणेच जनशताब्दीला सीएसटीपर्यंत नेण्याची मागणी औरंगाबादकरांनी केली आहे.

दादर ते औरंगाबाद धावणाऱ्या जनशताब्दीचा विस्तार जालन्यापर्यंत करण्यात आला. जालना येथून ही रेल्वेगाडी रविवारी (९ ऑगस्ट) पहाटे ४.३० वाजता निघेल. औरंगाबाद येथून नेहमीप्रमाणे सकाळी वाजता दादरला रवाना होईल. दहा डब्यांच्या रेल्वेला केवळ एक वातानुकूलित डबा वाढवण्याची शिफारस करण्यात आली असून, या रेल्वेला जास्तीचे पाच डबे जोडण्याची मागणी मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी केली.
जनशताब्दीचे कमी झाले १५ किमी अन् वाढला ६५ किमीचा...
इतर रेल्वेंचा विस्तार का नाही... :जनशताब्दीप्रमाणेच जालना -नगरसोल डेमू शटलचा विस्तार मनमाडपर्यंत करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी केली आहे. तपोवन सचखंड एक्स्प्रेसवरील ताण कमी करण्यासाठी डेमू शटलचा विस्तार मनमाडपर्यंत करून मनमाडहून सकाळी १० वाजता औरंगाबादसाठी सोडण्यात यावे पुन्हा दुपारी १२ वाजता मनमाडसाठी सोडल्यास प्रवाशांची गैरसोय टळेल आणि दुपारी जाणाऱ्या सचखंड
तपोवनवरील ताण कमी होईल.

नांदेड-संत्रागच्छी एक्स्प्रेसचा विस्तार औरंगाबाद, तसेच पूर्णा- पाटणा एक्स्प्रेसही आैरंगाबाद येथून सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.
अडीचशेवर वेटिंग असलेल्या रेल्वे
हैदराबाद-अजमेर रेल्वे नियमित करण्यात यावी तिचा विस्तार गुलाबी शहर जयपूरपर्यंत केला जावा. औरंगाबाद मार्गे जाणारी कोल्हापूर- धनबाद रेल्वे आठवड्यातून दोन वेळा चालवावी. ओखा- रामेश्वरम नियमित करावी. नगरसोल- चेन्नई आठवड्यातून दोन वेळा करावी. उपरोक्त गाड्यांचे वेटिंग अडीचशे ते तीनशे इतके आहे.
काझीपेठ - औरंगाबाद व्हाया नांदेड औरंगाबाद जाणारी बजेटमध्ये घोषित रेल्वे लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुकुंदवाडीला थांबा द्यावा
शहराचाविस्तार लक्षात घेताना सिडको- हडको, मुकुंदवाडी, गारखेडा , जयभवानीनगर, चिकलठाणा, हर्सूल आदी भागांतील प्रवाशांच्या सोयीसाठी मुकुंदवाडी येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणीही जोर धरत आहे.
सीएसटीपर्यंत न्यावे
औरंगाबादहून मुंबईला मंत्रालय हायकोर्टात कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय जनशताब्दीमुळे होत आहे. पूर्वीप्रमाणेच ही गाडी सीएसटीपर्यंत नेण्यात यावी. औरंगाबाद ते दादरपर्यंत १३७ रुपये सीटिंग कारचे तिकीट असून, दादर ते मंत्रालय अथवा सीएसटीपर्यंतच्या टॅक्सी प्रवासाला दोनशे ते अडीचशे रुपये मोजावे लागतात. शिवाय लोकलचे तिकीट काढण्यासाठी चार ते पाच प्लॅटफॉर्म ओलांडून जावे लागते.
बातम्या आणखी आहेत...