आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उचापती’ पतींना मनपात बंदी! आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले अधिकाऱ्यांना आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महानगर पालिकेत११५ निर्वाचित सदस्यांत ६० महिला आणि ५५ नगरसेवकांचा सहभाग आहे. मात्र, ६० पैकी काही नगरसेविका सोडल्या, तर उर्वरित नगरसेविकांचे पती मुले मनपात शिरकाव करून उचापती करतात. या प्रकाराचा त्रास आयुक्तांसह अधिकाऱ्यांनाही होत असल्याने आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शनिवारी तोंडी आदेश देत या “उचापती’ पतींना म्हणजेच नगरसेविकांच्या पतींना आयुक्तांना अधिकाऱ्यांना भेटण्यास बंदी घातली आहे.

वॉर्डातील कामांसह इतर काही अडचणींसाठी नगरसेविकांऐवजी त्यांचे पतीच मनपात लुडबूड करतात. यापूर्वी अधिकाऱ्यांना अरेरावी करण्याचे प्रकारही घडले आहेत. तसेच नगरसेविकांसोबत त्यांचे पतीही अनेकदा आयुक्तांच्या तसेच अधिकाऱ्यांच्या दालनात जातात. आता मात्र बकोरिया यांच्या आदेशामुळे उचापती करणाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. मनपा मुख्यालयाच्या कामकाजात लक्ष घालणाऱ्या नगरसेविकांच्या पतिराजांना आयुक्तांनी बंदी आदेश जारी केले आहेत. त्यामुळे आता नगरसेविकांनाच उर्वरितपान.८

पिटाळून लावले पतिराजांना
बकोरियांनीनगरसेवकांची यादीच मागवली असून नगरसेविकांच्या पतींना ते दालनात आले की बाहेर काढले जात आहे. कुणी बळजबरीने आयुक्तांच्या दालनात प्रवेश केलाच तर दालनाबाहेर जा, अन्यथा तुमच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल, अशी ताकीदही देण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...