आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालकमंत्री म्हणाले कचरा आढळल्यास आयुक्तांवर गुन्हा दाखल करू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. तक्रारीदेखील वाढत आहेत. स्वच्छ शहर सुंदर ठेवणे महापालिका आयुक्तांची जबाबदारी आहे. तशा सूचनाही आपण आयुक्त बकोरिया यांना दिल्या आहेत. यापुढे कचरा आढळल्यास आयुक्तांवर गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा पालकमंत्री रामदास कदम यांनी दिला. स्वातंत्र्य दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्तालयात आयोजित समारंभात ते बोलत होते. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर त्र्यंबक तुपे, आमदार संजय शिरसाट, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

इसिसशीसंबंधित लोक सापडतात तेव्हा दु:ख होते : कदमपुढे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून राष्ट्रध्वजाचा राज्यघटनेचा सन्मान करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सर्वांगीण विकासाबरोबर शातंता सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध आहे. जेव्हा इसिसशी संबंधित लोक सापडतात, हे ऐकून दु:ख होते.
देशाच्या राज्यघटनेने सर्वांना अधिकार दिलेले आहेत. सर्वांनी या राज्यघटनेनुसार वागले पाहिजे. जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आपण सारे एक आहोत या भावनेने काम केले पाहिजे. सर्व समाजाचा विकास होणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्र्यांचे कौतुक :
विमानातूनयेताना सर्वत्र जलयुक्त शिवारची कामे कशी झाली आहेत आणि शिवजल क्रांती योजनेमुळे कसे पाणी साचले आहे हे सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘जलयुक्त शिवार’ योजना यशस्वीपणे राबवल्याचा आवर्जून उल्लेख केला. त्यानंतर कदम यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले. तसेच पोलिस आयुक्तालयात, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल, सोशल मीडियाचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, ज्ञानेश्वर साबळे, गजानन कल्याणकर यांना संबंधित शाखांचे आय.एस.ओ. ९००१-२०१५ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

विशिष्ट ठेकेदारासाठी पाचव्यांदा निविदा?
सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना अपेक्षित असणाऱ्या ठेकेदाराने या कामात सहभागी व्हावे यासाठी एकदा नव्हे तर चक्क पाच वेळा निविदा काढली, पण त्या ठेकेदाराला निविदा मिळणे अवघड बनल्याने ही उठाठेव केल्याचे समजते.
रिक्षांच्या फाइलीसाठी महापौरांची धावाधाव
१४ महिन्यांपूर्वी दोन कोटी रुपये देऊनही कचरा उचलण्यासाठी ५० रिक्षा खरेदी करण्याची प्रक्रिया मनपाने केली नसल्याबद्दल पालकमंत्र्यांनी झापाझापी करताच मंगळवारी मनपात महापौर, सभागृह नेते नंतर उपमहापौरांनी दिवसभर ठिय्या देत सर्व सोपस्कार करून फाइल एकदाची आयुक्तांच्या सहीसाठी पाठवली.

पालकमंत्री रामदास कदम यांनी १४ महिन्यांपूर्वी मनपाला कचरा वाहून नेण्यासाठी ५० रिक्षा करण्यासाठी कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता, पण ही खरेदीची प्रक्रिया आजतागायत झालीच नाही. स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन दिवस औरंगाबादेत असणाऱ्या पालकमंत्र्यांनी या विषयावरून चांगलीच झाडाझडती घेतली. महापौर त्र्यंबक तुपे यांना त्यांनी पैसे येऊन पडले, पण साध्या रिक्षा घेण्याचे काम आतापर्यंत होत नाही ही हद्द झाली असे उ द्गार काढले.
त्यावर महापौरांनी आयुक्तंाकडे बोट दाखवले. आयुक्तांनी पालकमंत्र्यांना वस्तुस्थिती सांगितली. पालकमंत्र्यांनी सुनावल्यानंतर महापौर त्र्यंबक तुपे, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ सकाळपासून मनपात होते. रिक्षाची निविदा पाचव्यांदा काढली असून ती आज उघडण्यासाठी या दोघांना जंग जंग पछाडावे लागले. लेखाधिकारी संजय पवार यांच्या अनुपस्थितीत लेखाधिकारी दुर्राणी सही करायला तयार नव्हते. काही वेळाने दुर्राणी यांनी सही करताच फाइल आयुक्तांकडून यांत्रिकी विभागाचे प्रमुख यु. जी. शिरसाट यांच्याकडे पाठवण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...