आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप, काँग्रेस, निम्मी शिवसेना ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या पाठीशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गैरव्यवहाराचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आलेले शहर अभियंता सखाराम पानझडे, नगररचना सहायक संचालक डी. पी. कुलकर्णी, लेखाधिकारी संजय पवार, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डाॅ. बी. एस. नाईकवाडे, शाखा अभियंता राजेंद्र वाघमारे यांना गेल्या महिन्यात मनपा सेवेत घेण्यात आले. त्याविरुद्ध गदारोळ होणार असा अंदाज आल्याने आॅगस्टमधील सभेत वंदे मातमरवरून गोंधळ उडवण्यात आला. सोमवारी सभेत शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी खोट्या नोटा उधळून अधिकारी निलंबन रद्दच्या निर्णयाचा निषेध नोंदवण्याचा इरादा जाहीर केला. त्यांना महापौर भगवान घडमोडेंनी निलंबित केले. यावरून भाजप, काँग्रेस आणि निम्मी शिवसेना अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभी असल्याचे स्पष्ट झाले. 

जंजाळांनी निलंबित अधिकाऱ्यांचा मुद्दा रेटून धरला. तेव्हा भाजपचे राजू शिंदे, प्रमोद राठोड, दिलीप थोरात, राज वानखेडे यांनी उघडपणे अधिकाऱ्यांची बाजू घेतली. या अधिकाऱ्यांवर जेवढ्या रकमेच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला, तेवढी रक्कम निलंबन काळात त्यांना देण्यात आली. आता त्यांच्याकडून काम करून घेण्यास काय हरकत आहे, असे त्यांचे म्हणणे होते. काँग्रेसचीही तीच भूमिका होती. शिवसेनेचे घोडेले फक्त जंजाळ यांचे निलंबन मागे घ्या एवढेच म्हणत होते. सभेला राजू वैद्य, विकास जैन हे वैयक्तिक कारणाने अनुपस्थित होते. माजी महापौर तुपे विलंबाने सभागृहात आले. सभागृहनेते मनगटे हे नियोजन मंडळाच्या निवडणुकीत व्यग्र होते. 

तीनवेळा का केली सभा तहकूब ?
अधिकाऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांना कामावर घेतले आहे. तेव्हा आम्हीही पैसे देतो, आमची कामे करा, असे म्हणत माजी सभागृहनेते राजेंद्र जंजाळ आयुक्तांच्या अंगावर नोटा उधळणार होते. याची महापौर, भाजप तसेच सेनेच्या सदस्यांनाही कल्पना आली होती. पहिल्यांदा सभा तहकूब करून जंजाळ यांना चर्चेसाठी महापौरांच्या सभागृहातील मिनी चेंबरमध्ये बोलावण्यात आले. जेव्हा जंजाळ चेंबरमध्ये गेले तेव्हा भाजपच्या एका सदस्याने जंजाळ यांची खोट्या नोटांनी भरलेली बॅग गायब केली. हे लक्षात आल्यानंतर बॅग गायब झाली म्हणून काय झाले, मी दुसऱ्या मागवतो, असे जंजाळ यांनी सांगितले. तेव्हा दुसऱ्यांदा सभा तहकूब करण्यात आली. सभागृहात बाहेरून कोणतीही बॅग येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. त्यानंतरही मी बोलणारच, यावर जंजाळ ठाम होते. यातून मार्ग कसा काढायचा, यावर मंथन झाले. अखेर जंजाळ यांना निलंबित करण्याचे ठरले. जंजाळ यांनी आपला मुद्दा लावून धरावा, त्याला बाकींच्यानी विरोध करावा म्हणजे जंजाळ यांचे सदस्यत्व निलंबित करता येईल, असे ठरले. त्यानुसार तिसऱ्यांदा सभा तहकूब करण्यात आली. ऐनवेळी सदस्याने गोंधळ घातला म्हणून नव्हे तर ठरवून जंजाळ यांचे निलंबन झाले. 

राजदंड पळवण्याचा प्रयत्न 
निलंबितअधिकाऱ्यांना पुन्हा मिानगरपालिकेच्या सेवेत घेतल्याच्या मुद्यावरून वातावरण तापल्यानंतर हा प्रश्न रेटून धरणारे शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ आणि इतरांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. 
बातम्या आणखी आहेत...