आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे बजेट 1399 कोटींचे, प्रत्यक्ष कामे होणार फक्त 150 कोटींची!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महानगरपालिकेचे विद्यमान वर्षाचे अंदाजपत्रक १३९९ कोटी रुपयांचे आहे. हा आकडा बघितला तर आपली महानगरपालिका वर्गाची असल्याचे जाणवेल. परंतु भारावून जाण्यात अर्थच नाही. कारण हा आकडा औरंगाबादकरांच्या काही उपयोगाचा नाही. या १३९९ रुपयांतून जास्तीत जास्त १५० कोटींची विकास कामे होणार आहेत. बाकीची रक्कम फक्त चर्चा करण्यासाठीच आहे. दीडशे कोटी रुपयांतून अंतर्गत रस्ते, जलवाहिन्या बदलणे हीच कामे नागरिकांच्या कामाची आहेत. 

 

अंदाजपत्रक अंतिम करणारे तत्कालीन महापौर भगवान घडमोडे यांना फक्त ११ महिन्यांचा कालावधी मिळाला होता. या काळात वाॅर्डातील कामे घेऊन आलेला कोणताही नगरसेवक नाराज होऊ नये म्हणून त्यांनी येईल त्या प्रस्तावाचा समावेश अंदाजपत्रकात केला. एप्रिलला आर्थिक वर्ष सुरू होते. तेव्हाच अंदाजपत्रक तयार व्हायला हवे. प्रत्यक्षात हे अंदाजपत्रक ऑक्टोबरअखेरीस तयार झाले. या सात महिन्यांत नगरसेवक वाॅर्डातील वेगवेगळी कामे घेऊन येत होती आणि त्याचा समावेश अंदाजपत्रकात होत होता. या वर्षाचा अंदाजपत्रकात स्पील ओव्हरची ३७५ कोटींची कामे आहेत. म्हणजे घडमोडे यांनी १०२४ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले असे म्हणावे लागेल. 

 

आवक-जावकचा असा आहे खेळ : उत्पन्नाच्या स्राेतातून महापालिकेकडे ४७५ कोटींपर्यंत निधी येईल. मालमत्ता कराचा आकडा वाढला तरच त्यात आता वाढ होऊ शकेल. परंतु प्रत्यक्षात महापालिकेचा अनिवार्य खर्च ३३७ कोटींपर्यंत आहे. म्हणजेच विकास कामांसाठी १३८ कोटी शिल्लक राहतात. मार्चमध्ये शासनाचे अनुदान, कर वसुली वाढली, असे गृहीत धरले तर फक्त नि फक्त १५० कोटींचीच विकास कामे होऊ शकतात हे स्पष्ट होते. 

 

स्पील ओव्हरचा ओव्हरडोस 

मागील वर्षाच्या अंदाजपत्रकातील काम पुढच्या अंदाजपत्रकात घेणे म्हणजे स्पील ओव्हर असा सरळसोट अर्थ आपल्याकडे काढला जातो. त्यामुळे स्पील ओव्हरच्या कामांचा आकडा वाढतो. अंदाजपत्रक तयार करताना मागील वर्षाच्या अंदाजपत्रकानुसार ज्या कामाचा कार्यादेश (वर्क ऑर्डर) झाला आहे, जे काम प्रगतिपथावर आहे, अशा कामांचा समावेश स्पील ओव्हर म्हणून करणे अपेक्षित असते. परंतु मागील वर्षात काम झाले नाही तेव्हा घ्या पुढच्या अंदाजपत्रकात असा धडाका लावला जातो. त्यामुळेही अंदाजपत्रकाचा आकडा फुगलेला दिसतो. 

 

नगरसेवक का धरतात आग्रह? 
जुन्या अंदाजपत्रकातील न झालेले काम पुढील वर्षी करायचे असेल तर ते नव्याने समाविष्ट केले जाऊ शकते. मागील वर्षाचे काम नव्याने घेतले तर नगरसेवकाच्या नावावरील कामे वाढतात. त्यामुळे मागचे काम तुम्ही स्पील ओव्हरमध्ये घ्या नव्या कामांच्या यादीत माझी पाच कामे टाका असे तो सांगतो. म्हणजे मागील वर्षाची पाच आणि नवीन पाच अशी दहा कामे होतात. नव्याने काम घेतले तर पाचच घेता येतात. त्यामुळे नगरसेवक हा फंडा वापरतात. 

 

रोषाला सामोरे जावे लागेल 

फक्त १५० कोटींची कामे होतील. अन्य कामे होणारच नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे नगरसेवक पुन्हा ही कामे स्पील ओव्हरमध्ये घ्या, अशी मागणी करतील म्हणजे पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाचाही आकडा असाच वाढेल आणि उत्पन्न वाढल्याने पुढील वर्षीही दीडशे कोटींची कामे होतील. यामुळे अनेक महत्वाची कामे रखडल्याने मनपा नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागू शकताे. 

 

अंदाजपत्रक दुपटीच्या पुढे 
जेवढे आपले उत्पन्न अपेक्षित आहे, त्यानुसार अंदाजपत्रक तयार व्हायला हवे. म्हणजे मनपाचे उत्पन्न ४७५ कोटींपर्यंत जाणार असल्याचे आजघडीला दिसते. ते अंदाजपत्रक तयार करतानाही दिसत होते. त्यात मालमत्ता पाणीपट्टी तसेच अन्य स्राेतांतून ५० कोटींची वाढ गृहीत धरून सव्वापाचशे ते साडेपाचशे कोटींचे अंदाजपत्रक तयार व्हायला हवे होते. प्रत्यक्षात त्याच्या दुपटीच्याही पुढे ते तयार केले गेले. 

बातम्या आणखी आहेत...