आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO : मैत्रीदिनी 350 हौशी छायाचित्रकारांनी कॅमेऱ्यात कैद केला अजिंक्य देवगिरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हौशी छायाचित्रकारांच्या ‘औरंगाबाद फोटोग्राफी लव्हर्स’ ग्रुपच्या सुमारे ३५० सदस्यांनी रविवारी मैत्रीदिनी देवगिरी किल्ल्याला कॅमेऱ्यात कैद केले. आठ वर्षांच्या नवशिक्यांपासून पन्नाशी उलटलेल्या अनुभवींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. छायाचित्रणाचे धडे गिरवताना अजिंक्य देवगिरी किल्ल्याला कॅमेऱ्याच्या चौकटीत बसवण्याच्या प्रयत्नांत रमलेल्या या चिमुरड्याची धडपड ऋषिकेश होशिंग यांनी टिपली. 

स्पर्धकांशी संवाद 
रविवारी सकाळी ८ ते ११ असे दोन तास या ३५० हौशी छायाचित्रकारांनी असंख्य छायाचित्रे घेतली. देवगिरी किल्ल्याच्या कणाकणात भरलेला इतिहास जाणून घेत त्याचे भव्य रूप टिपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. स्पर्धेनंतर प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार श्रीकृष्णा पाटील, राजेंद्र दुमणे नितीन सोनवणे यांनी स्पर्धकांशी संवाद साधला. 
 
पुढील स्लाइडवर पाहा, छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेले फोटो...
बातम्या आणखी आहेत...