आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटी : सोमवारी निश्चित होईल सल्लागार समिती, 92 कोटींच्या पहिल्या हप्त्याचे पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्मार्ट सिटीसाठी तीन अांतरराष्ट्रीय संस्थांनी निविदा दाखल केल्या असून निविदेतील तांत्रिक बाबीत या संस्था पास झाल्या आहेत. वित्तीय निविदा उघडण्यापूर्वी मुंबईत स्मार्ट सिटीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अपूर्व चंद्रा यांनी शुक्रवारी पीएमसी प्रतिनिधी आणि मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना बैठकीला बोलावले होते. या वेळी चर्चा करून निविदा प्रक्रिया अंतिम करण्याची सूचना केली. सोमवारी पीएमसी निश्चित करण्यात येणार आहे. 

शुक्रवारी सकाळीच बकोरिया आणि स्मार्ट सिटीचे समन्वयक कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी मुंबईला प्रस्थान केले होते. चंद्रा यांच्यासमवेत निविदा दाखल केलेल्या संस्थांचे प्रतिनिधीही तेथे आले होते. या वेळी संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या संस्थेच्या वतीने केलेल्या कामांचा धावता आढावा दिला. स्मार्ट सिटीसाठी त्यांनी केलेल्या नियोजनाचे आणि कुठे कशा पद्धतीने काम करणार याचीही माहिती दिली. त्यानंतर चंद्रा आणि बकोरिया यांच्यातही चर्चा झाली. त्यानुसार बकोरिया यांनी शनिवारी आणि रविवारी निविदा उघडून सोमवारी नाव फायनल करण्याचा निर्णयही येथे चंद्रा यांच्या सूचनेनुसार घेतल्याचे सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...