आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदूर, पुण्यासारखे चकाचक सादरीकरण करून आणा, स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्राच्या सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्मार्टसिटीसाठी प्रस्ताव सादर करण्याआधी पुणे, कोची, इंदूर, जबलपूरचे प्रस्ताव पाहा, तसे चकाचक सादरीकरण करून आणा ,असे आज केंद्राच्या वतीने दुसऱ्या टप्प्यात सहभागी झालेल्या शहरांना सांगण्यात आले.

स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्याची स्पर्धा या महिनाअखेरीस सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात निवड झाल्याने औरंगाबादला दुसऱ्या टप्प्यात सहभागी व्हावे लागले आहे. गेल्यावेळी केलेल्या चुका करू नका अशा सूचना औरंगाबाद मनपाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार नवीन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी कामाला सुरुवातही केली आहे. तिकडे आज दिल्लीत केंद्रीय नगरविकास सचिव अजयकुमार यांनी दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धक शहरांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यात औरंगाबाद मनपाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रमेश पवार कार्यकारी अभियंता सिकंदर अली सहभागी झाले होते. आजच्या बैठकीत पुणे, इंदूर, कोची, जबलपूर या चार शहरांच्या प्रस्तावांचे सादरीकरण करण्यात आले. असे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच तुमचे मागच्या वेळचा प्रस्ताव पुन्हा एकदा पाहा त्यात अशा सुधारणा करून चकचकीत प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले.

औरंगाबादचे कौतुक
वर्षाकाठी औरंगाबादेत लाख पर्यटक येतात. त्यात २१ हजारांहून अधिक विदेशी पर्यटक असतात. शिवाय डीएमआयसीमुळे येणारे उद्योग ग्रीनफील्ड यांची प्रस्तावात चांगली सांगड घातल्याचे सांगत औरंगाबादचे कौतुक करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...