आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : ‘एटीआय’प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थी परीक्षेसाठी मंगळवारी ट्रॅव्हल्स क्रूझरने राजस्थानला रवाना झाले. (छाया : मनोज पराती ) - Divya Marathi
विद्यार्थी परीक्षेसाठी मंगळवारी ट्रॅव्हल्स क्रूझरने राजस्थानला रवाना झाले. (छाया : मनोज पराती )
औरंगाबाद - एटीआय म्हणजेच औरंगाबाद टेक्निकल इन्स्टिट्यूटने बोगसगिरी करून विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आपण गुन्हा दाखल करू शकत नाही. त्यासाठी तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी तक्रार करणे अपेक्षित असल्याचे सिडको, एन-७ ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी म्हटले आहे, तर शिवणकर यांच्या मते फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरच त्यांनी कारवाई करावी. दोघांच्या टोलवाटोलवीदरम्यान आवेश कुरेशींनी मात्र सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी राजस्थानला रवाना केले आहे. “प्राध्यापक नाहीत, प्रयोगशाळा नाही तरीही सुरू आहे दोन इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट’ या मथळ्याचे वृत्त दिव्य मराठीने १० जूनच्या अंकात प्रसिद्ध केले होते. कुठल्याही प्रकारच्या पायाभूत अथवा शैक्षणिक सुविधा नसताना बजरंग चौकातील एटीआयमध्ये, तर वाळूज येथील महावीर चौकात एटीआय विद्यापीठाच्या नावाखाली अभियांत्रिकी शिक्षणाचा बाजार मांडण्यात आला होता. ह्यदिव्य मराठीह्णने स्टिंग ऑपरेशन करून बनावट संस्थेचा पर्दाफाश केला होता. सुमारे दोनशे विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात आलेली आहे.
 
प्रत्येक विद्यार्थ्याकडून वार्षिक ८५ हजार ते एक लाख रुपयांची लूट करून अभियांत्रिकी पदविका देण्याचा बनाव कुरेशी यांनी केला आहे. या विरोधात मनीष नरवडे यांनी सोमवारी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना निवेदन दिले. त्याशिवाय एन-७, सिडको पोलिस ठाण्यातदेखील पुराव्यांसह तक्रार करण्यात आली. मात्र, पोलिसांनी अद्याप काहीच कारवाई केलेली नाही. प्रजापती यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी गुन्हा दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 

जोपर्यंत डॉ. शिवणकर यांच्याकडून तक्रार प्राप्त होत नाही तोपर्यंत काहीच कारवाई करू शकत नाही. मात्र, पोलिस आपल्या स्तरावरून चौकशी करत आहेत, तक्रारीमध्ये काही तथ्य आढळले तर पुढील कारावाई करू, असे त्यांनी म्हटले आहे. संस्था बोगसच दरम्यान, डॉ. शिवणकर यांनी पोलिसांकडे तक्रार देणार नसल्याचे म्हटले आहे. ह्यएटीआयह्ण ही संस्था बोगस असून संकेतस्थळावर बोगस संस्थांची यादी प्रकाशित केली आहे, त्यामध्ये एटीआयच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे पुन्हा स्वतंत्र तक्रार करण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शहानूरमियाँ दर्गा परिसरातून ट्रॅव्हल्स बसेस करून सुमारे दीडशे विद्यार्थी राजस्थानला रवाना झाले आहेत. 

पुढील स्लाइडवर वाचा बस आणि क्रूरुझरने विद्यार्थी रवाना, काहींनी जाण्याचे टाळले... 
 
बातम्या आणखी आहेत...