आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएचडीचे हजार ६४७ प्रवेश, रिक्त जागांचाही लवकर निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएचडी प्रक्रिया मार्गी लागली असून हजार २६ मार्गदर्शकांकडे (गाइड) हजार ६४७ संशोधकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. संशोधन मान्यता समित्यांच्या (आरआरसी) बैठकाही जवळपास आटोपल्या असून हजार २४८ जागांपैकी हजार ९६१ जागा रिक्त राहिल्या आहेत. रिक्त जागांच्या प्रवेशासंबंधी लवकरच निर्णय होणार आहे.
विज्ञान विद्याशाखेत सर्वाधिक ६८१ संशोधक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले असून विज्ञान शाखेत सर्वाधिक ७३५ जागा रिक्त आहेत. सामाजिकशास्त्रे शाखेत ६७० जणांनी प्रवेश निश्चित केले असून येथे अपेक्षेप्रमाणे फक्त ३३ जागा रिक्त आहेत. एकूण ४४ पीएचडी विषयांपैकी १२ विषयांमध्ये एकही जागा रिक्त नाही. त्यामध्ये पाली अँड बुद्धिझम, संगणकशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, जनसंवाद वृत्तपत्रविद्या, ग्रंथालयशास्त्र, समाजकार्य, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि रसायन तंत्रज्ञान या विषयांचा समावेश आहे. हिंदी-३४४, भौतिकशास्त्र-२११, प्राणिशास्त्र-२५९ आणि औषधनिर्माणशास्त्र-१२९ असे रिक्त जागांचे प्रमाण आहे. पेट-३ उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी यंदा हजार २६ गाइड उपलब्ध आहेत. हजार २५८ जागांसाठी हजार ८५४ संशोधन इच्छुकांना संशोधन आराखड्यासह सादरीकरणासाठी पाचारण केले होते. त्यांच्यापैकी पहिल्या टप्प्यात फक्त हजार ६४७ संशोधक पीएचडीसाठी पात्र ठरले आहेत.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून जाणून घ्‍या, रिक्‍त जागा..