आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून औरंगाबादचा पाणीपुरवठा खंडित?, पाणीपट्टी थकबाकीवरून जालना व पैठणला नाेटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - औरंगाबाद महानगरपालिका आणि जालना व पैठण नगरपालिकेने जलसंपदा विभागाची थकीत पाणीपट्टी न भरल्यामुळे या तिन्ही शहरांचा पाणीपुरवठा बुधवारपासून खंडित करण्याची नोटीस जलसंपदा विभागाने मंगळवारी बजावली.  या तीन पालिकांकडे २०१६- १७ या आर्थिक वर्षातील ८ कोटी ५९  लाख रुपयांची पाणीपट्टी थकित आहे.

जायकवाडी धरणातून औरंगाबाद, पैठण जालन्याला पाणीपुरवठा होतो. या तिन्ही पालिकांनी वर्षभरापासून पाणीपट्टी भरली नसल्यामुळे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश धनशेट्टी व अशोक चव्हाण यांनी जायकवाडी धरणातील या तिन्ही शहरांच्या पंपहाउसच्या  भिंतीवर बुधवारपासून पाणीपुरवठा खंडित केला जाईल, अशा नोटिसा चिकटवल्या. नोटिसीनुसार पाच टप्प्यांत पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. 
 
थकबाकी अशी
६.५१ कोटी - औरंगाबाद
१.३२ कोटी - जालना
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...