आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारपासून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत, बुधवारी रात्री दोन वाजता आटोपली दुरुस्तीची कामे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनपाने पाइपलाइन दुरुस्तीसाठी घेतलेल्या खंडानंतर मंगळवारी रात्री १४०० एमएमच्या पाइपलाइनने पाणीपुरवठा केला गेला. मात्र यामुळे पाण्याचा दाब कमी असल्याने बुधवारी रात्री दोन वाजेपर्यंत ७०० एमएमच्या पाइपलाइनची दुरुस्ती करण्यात आली. गुरुवारी शहरातील काही भागांना पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र सोमवारपासून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले. 

जायकवाडीतून नक्षत्रवाडीपर्यंत टाकण्यात आलेल्या पाइपलाइनवर मोठ्या प्रमाणात गळत्या होत्या. त्यामुळे किमान तीन एमएलडीपेक्षा जास्त पाणी वाहून जात होते. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मंगळवारी २४ तासांचे खंडण घेऊन दुरुस्त्या करण्यात आल्या. १४०० एमएमच्या पाइपवर एकाच ठिकाणी गळती असल्याने त्याच दिवशी दुरुस्त करण्यात आली. मात्र ७०० एमएमच्या पाइपलाइनवर मोठ्या पाच दुरुस्त्या होत्या. त्यामुळे काम करण्यास विलंब लागला. त्यात ढोरकीन येथील टाकीची स्वच्छता करण्याचे काम हाती घेतल्याने आणखी विलंब झाला. या टाकीत साप दिसल्याने रात्री दहा वाजता काम थांबवण्यात आले. बुधवारी रात्री दोन वाजता शहरात ७०० एमएमच्या लाइनने पाणी सोडण्यात आले. 

या भागाला मिळाले पाणी
गुरुवारी शहरातील रमानगर, काल्डा कॉर्नर, सिंधी कॉलनी, बालाजीनगर, गांधीनगर, रोकडा हनुमान कॉलनी, भोईवाडा, काचीवाडा, मिल कॉर्नर, गरमपाणी, भुजबळनगर या भागासह इतर काही भागांत पाणीपुरवठा करण्यात आला.
 
या भागात आज पाणी 
उस्मानपुरा,श्रेयनगर, पैठण गेट, नूतन कॉलनी, पडेगाव, हनुमान टेकडी परिसर आणि चिकलठाणाचा काही भाग. इतर भागांतही पाणी येणार आहे. 

आणखी तीन दिवस लागतील 
रात्रीच ७०० एमएमच्या पाइपलाइनचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे पाण्याचा दाब वाढला आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून दोन, तीन दिवस लागतील. 
- सरताज सिंग चहल, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा. 
बातम्या आणखी आहेत...