आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंधळ : भाजपवर उलटला कुरघोडीचा डाव, जिल्हा परिषदेत सभा घेण्यावरूनही राजकारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वसाधारण सभा सुरू करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर यांनी अध्यक्षांच्या खुर्चीचा ताबा घेतला. (छाया : अरुण तळेकर) - Divya Marathi
सर्वसाधारण सभा सुरू करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर यांनी अध्यक्षांच्या खुर्चीचा ताबा घेतला. (छाया : अरुण तळेकर)
औरंगाबाद - जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करण्याचा विरोधकांचा डाव सोमवारी फसला. जि.प.ची नियोजित सर्वसाधारण सभा वेळेत सुरू होत नसल्याने संतापलेल्या भाजप सदस्यांनी ज्येष्ठ सदस्यास अध्यक्षपदी विराजमान करून सभा सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गडबडीत या सदस्यांनी वंदे मातरमऐवजी राष्ट्रगीत गायले. हा प्रकार सुरू असतानाच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीईओ, सभापती सभागृहात दाखल झाले. सभा सुरू करण्यापूर्वी कोणते गीत गावे, हे माहिती नाही. तुम्ही राष्ट्रगीताचा अवमान केला, असे आरोप सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर केला. पुन्हा वंदे मातरम गायल्यानंतर सभेला सुरुवात झाली. 

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर चार महिन्यांनी सोमवारी पहिली सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली. एक वाजेची सभा दीड झाला तरी सुरू झाल्यामुळे भाजपचे सदस्य संतापले. अध्यक्ष, उपाध्यक्ष नसलेे तरी सदस्य हजर आहेत, ज्येष्ठ सदस्य पाथ्रीकर यांनी अध्यक्षपद भूषवावे, सचिवांनी सभा सुरू करावी, असा ठराव एल. जी. गायकवाड यांच्यासह अन्य सदस्यांनी घेतला. अध्यक्षपदी पाथ्रीकर यांना बसवून राष्ट्रगीत सुरू करण्यात आले अन् येथेच सत्ताधाऱ्यांना कोंडित पकडण्याचा विरोधकांचा डाव फसला. दरम्यान, हा प्रकार सुरू असतानाच अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, सीईओ मधुकरराजे आर्दड यांनी धावत सभागृह गाठले. वंदे मातरम गाऊन सभेला सुरुवात करण्यात आली. उशिरा झाल्याबाबत किशोर बलांडे यांनी दिलगिरी व्यक्त केली. विरोधकांनी सभेच्या नियमाचा कसा भंग अवमान केला, हेही निदर्शनास आणून दिले. चूक उमगल्याने भाजप सदस्यांना गप्पच राहावे लागले. 
 
वेळेत सभा घेण्याचा ठराव : सत्ताधाऱ्यांनी नियमाप्रमाणे सभा घ्याव्यात, त्यासाठी सदस्यांना पत्रव्यवहार करण्याची वेळ येऊ देऊ नये. नियोजित वेळेत सभा सुरू व्हावी. दुपारऐवजी सकाळी ११ वाजता सभेचा वेळ निश्चित करावा, असा ठराव या वेळी संमत करण्यात आला. 
 
नवीन विभागात सभा घेण्याचा प्रस्ताव 
६२ सदस्यांसह अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांच्या उपस्थितीमुळे जि. प. चे सभागृह अपुरे ठरत आहे. सोमवारीही अनेक सदस्यांना बसण्यासाठी जागा नव्हती. यामुळे नवीन ठिकाणी सभा घ्यावी, अशी मागणी एकमुखी सर्वच सदस्यांनी केली. यावर शिक्षण विभागाच्या सभागृहात सभा घेण्याचा विचार असून सर्वांच्या मतानुसार जागा निश्चित केली जाईल. तसेच नवीन सभागृह इमारतीसंदर्भातही निर्णय घेतला जाईल, असे अध्यक्षा अॅड. डोणगावकर यांनी स्पष्ट केले. 
 
कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट बसवण्यावरून गदारोळ 
औरंगाबाद - कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट बसवण्याचा प्रश्न तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावरून जि.प. सभेत गदारोळ झाला. गेट बसवण्यासह सर्वेक्षण करून सिमेंट भिंत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणी अडवल्यानंतरच ठेकेदाराला निधी अदा करण्यावरही शिक्कामोर्तब झाले. गेटअभावी कोल्हापुरी बंधाऱ्यांतून पाणी वाहून जाते. याबाबत ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची सभेत दखल घेण्यात आली. ५८५ पैकी २१२ कोल्हापुरी बंधाऱ्यांना लोखंडी गेट बसवण्याचे नियोजन आहे. त्याला मान्यता द्यावी, अशी मागणी प्रशासनाने करताच काँग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला. तर भाजप सदस्यांनी मान्यता दिली. आधीचे गेट कुठे गेले ? असा सवाल अविनाश गलांडे, किशोर बलांडे, रमेश बोरनारे यांनी केला. शिवाजी पाथ्रीकर मधुकरराव वालतुरे यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, गलांडे बलांडे ऐकण्यास तयार नव्हते. गेटऐवजी सिमेंट भिंत बांधण्याच्या मुद्द्यावर सहमती झाल्यानंतर अध्यक्षा उपाध्यक्ष यांनी आवश्यकतेनुसार गेट बसवणे, सिमेंट भिंत उभारण्याचा निर्णय घेऊ, पाणी साठले तरच ठेकेदाराला रक्कम अदा करू, असा निर्णय घेत ठराव मंजूर केला. दरम्यान, फक्त चर्चा झालेली असताना टॅब्लेट औषधी खरेदी केली आहेत. अडीच कोटींचा तो ठराव सहा महिन्यांनंतर मंजुरीसाठी ठेवण्यात आला. यावर नवनिर्वाचित सदस्यांनी अाक्षेप घेतला. त्यावर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असा निर्णय घेण्यात आला. 
 
प्रत्येक ग्रामपंचायतीला १० विहिरी : एमआरजीएसच्या कामांची चौकशी करावी, तीन वर्षांपासून मजुरांचे पैसे मिळाले नाहीत, ते द्यावे, असा ठरावही संमत करण्यात आला. प्रत्येक ग्रामपंचायतीला १० विहिरी देण्याच्या सूचना अध्यक्षा अॅड. डोणगावकर यांनी दिल्या. 
बातम्या आणखी आहेत...