आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडी डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शनचे १२८ देशात कॉपीराईट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ.मुकुंद सबनीस - Divya Marathi
डॉ.मुकुंद सबनीस
औरंगाबाद - औरंगाबादच्या गारखेड़यातील एका तरुण डॉक्टरने आयुर्वेदाला कारर्पोरेट लूक देण्याचा मान मिळवला आहे. सतत प्रयोगशाळेत राहून रुग्णकल्याणासाठी धडपडणाऱ्या या डॉक़टरने स्वतचे प्रिस्क्रीप्शनच कॉपीराईट केले आहे. तेही तब्बल १२८ देशात.एव्हढ्या देशांत प्रिक्रीप्शन कॉपीराईट करणारे ते देशातील पहिले डॉक्टर आहेत. जपान, जर्मनीसह अवघ्या युरोप खंडातील डॉक्टर आयुर्वेदाचे प्रशिक्षण घेण्यासाठी औरंगाबाद शहरात येतात हे विशेष.
डॉ.मुकुंद सबनीस यांचे वय अवघे चाळीस आहे.एव्हढया लहान वयात त्यांनी आयुर्वेदाची महती जगभरात पोचवण्यात मोठा हातभार लावला आहे.ते गेल्या अठरा वर्षापासून जवाहरकॅालनी जवळील स्नेहवर्धिनी सोसायटीत आयुर्वेदाची प्रॅक्टीस करतात.अनेक रुग्णांचे दुर्धर आजार बरे करताना त्यांना प्रयोगशा‌ळेची गरज वाटली त्यातूनच बीड बायपास येथे त्यांनी मराठवाड्यातील पहिली आयुर्वेद लॅब तयार केली.आता शहरात तीन प्रयोगशाळा आहे.तेथे मॉडर्न मेडिसिनला लागणारी मशिनरी त्यांनी आयुर्वेदीक चाचण्या करण्यासाठी प्रथमच वापर केला.पाच कोटी रुपयांपर्यत किमतीची मशिनरी या प्रयोगशाळांत आहेत.

पुढे वाचा... गुड ओबेसिटी आणि बॅड ओबेसिटी..