आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: पोलिस कारवाईत दंग, 5 मिनिटांत 2 विचित्र अपघात; 4 गाड्या एकमेकांवर धडकल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील मोंढा नाका चौकातील उड्डान पुलावर सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास 5 मिनिटांत 2 विचित्र अपघात झाले. एका दुचाकीस्वाराने कारला मागून धडक दिली. या घटनेला पाच मिनिटे होत नाही तोच 500 फुटाच्या अंतरावर 4 कार एकेकमेकांवर धडकल्या.

दरम्यान, मोंढा नाक्याच्या सिग्नलवर 1 पीएसआय आणि 10 पोलिस कर्मचारी रिक्षा तसेच विना हेल्मेटधारकांवर कारवाई करण्‍यात दंग होते. त्याचवेळी मोंढा नाका उडाणपुलावर एक दुचाकी कारला धडकली. नंतर चार कार एकमेंकाना धडकल्या. या अपघातामुळे आकाशवाणी चौक, मोंढा नाकादरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. अर्ध्या तासांनंतर पोलिस घटना स्थळी पोहोचल्यानंतर वाहतुकीची कोंडी दूर झाली.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, या विचित्र अपघाताचे फोटोज...
(छायाचित्रकार- रवी खंडाळकर)
बातम्या आणखी आहेत...