आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या अाैरंगाबाद दाैऱ्याची बातमी फुटलीच कशी : तस्लिमा नसरिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोलिसांशिवाय कुणालाही माझ्या औरंगाबाद दौऱ्याची माहिती नव्हती. मग ही बातमी फुटली कशी, असा सवाल करीत विख्यात लेखिका तस्लिमा नसरीन यांनी त्यांना विमानतळावरून परतावे लागल्याची खंत व्यक्त केली.  
 
दोन दिवसांपूर्वी तस्लिमा यांचे विमानतळावर आगमन झाल्यावर तेथे एमआयएमच्या वतीने आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. त्याआधी तस्लिमा यांच्या दौऱ्याची खातरजमा करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी तारांकित हाॅटेलातही गोंधळ घातला होता. या साऱ्या प्रकाराबाबत तस्लिमा यांनी ट्विटरवरून भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात पत्रकार राहिलेल्या आमदार इम्तियाज जलील यांनी मला शहरात येऊ न देण्यासाठी जमाव गोळा करावा, याचे आश्चर्य व्यक्त केले आहे.   तस्लिमा म्हणतात, अजिंठा-वेरूळ लेणी पाहण्याचे माझे स्वप्न होते. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात ते पूर्ण होत नाही यावर माझा विश्वास बसत नाही. माझा दौऱ्याची माहिती मूलतत्त्ववाद्यांना कशी कळते, याचे आश्चर्य वाटते. मला हैदराबाद, कोलकाता, जयपूर आणि आता औरंगाबादमध्ये रोखण्यात आले. त्याचे मला दु:ख नाही. माझ्या हजारो चाहत्यांचे प्रेम माझ्यासाठी पुरेसे आहे.
बातम्या आणखी आहेत...