आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला पोलिसांनी ‘तिला’ दिली मायेची ऊब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - या जगात येऊन तिला अवघा एक महिनाच झाला. आईचीही तिला पुरती ओळख झाली नसावी. मात्र जन्मदात्रीलाच ती नकोशी झाली. म्हणून तिला कचराकुंडीत फेकून दिले. मात्र ‘मारणाऱ्यापेक्षा तारणारा मोठा’ या उक्तीनुसार कडाक्याच्या थंडीतही ही पोर वेळीच घाटीतील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीस पडली आणि तिला मायेची ऊब मिळाली. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घाटीतील वॉर्ड क्रमांक सहाच्या पाठीमागे घडली. या चिमुकलीवर महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली घाटीत उपचार सुरू आहेत.
रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घाटीतील वाॅर्ड क्रमांक सहाच्या पाठीमागे असलेल्या कचराकुंडीजवळून घाटीतील कर्मचारी जात होता. त्याला या चिमुकलीच्या रडण्याचा आवाज आला. त्याने तात्काळ आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता त्याला कपड्यात गुंडाळलेली चिमुकली दिसली. त्याने ही बाब तत्काळ इतरांना सांगितली. या घटनेची माहिती कळताच बेगमपुरा ठाण्यातील उपनिरीक्षक राजेंद्र बांगर, योगेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला घाटीत दाखल केले. महिला पोलिस कर्मचारी इजुल कंटे यांनी या चिमुकलीची काळजी घेतली. सोमवारी या चिमुकलीला बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात येणार आहे. या प्रकरणी अज्ञात आईवडिलांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रकिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...