आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ अधिसभा निवडणुकीचे निकाल 12 तासांनी लांबले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभा निवडणुकीचे निकाल १२ तासांनी लांबले आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सकाळी दहा वाजता मतमोजणीच्या प्रकियेला प्रारंभ झाला. पण मतपत्रिकांचे वर्गीकरण आणि गठ्ठे करण्यासाठी तब्बल तासांचा अवधी लागल्यामुळे गुरुवारी (७ डिसेंबर) रात्री आठ वाजता प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली.

 

मागील वेळी झालेल्या गलथान कारभाराचा धडा घेऊन या वेळी विद्यापीठ प्रशासनाने मतमोजणीसाठी बॅडमिंटन सभागृह घेतले होते. प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळी सुमारे २६६० पेक्षा अधिक मतपत्रिका अवैध ठरवण्यात आल्या. शुक्रवारी सायंकाळपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. महेंद्र शिरसाट, डॉ. वंदना हिवराळे आदींचे मतमोजणी प्रक्रियेवर बारकाईने लक्ष होते.

 

बातम्या आणखी आहेत...