आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1.75 लाख बँक खाती रडारवर, मराठवाड्यातील उलाढालींची प्राप्तिकर विभाग घेणार झडती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गेल्या ८ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता ५०० व १ हजाराच्या नोटांवर बंदी जाहीर झाली आणि औरंगाबादसह मराठवाड्यातील सोने-चांदी तसेच काळ्या पैशाला पाय फुटले. बँक खात्यांवर जुन्या नोटांच्या रूपात अमाप धन जमा होऊ लागले आणि तेवढेच नव्या नोटांच्या रूपात काढले जाऊ लागले. करदात्यांच्या अशा १ लाख ७५ हजार बँक खात्यांवरील उलाढाली प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असून संक्रांतीपूर्वी ही खाती तपासण्याचे काम सुरू होणार आहे. ज्या खात्यातील उलाढाली संशयास्पद आहेत किंवा ज्या खात्यांना काळा पैसा जमा करून तो पांढरा केल्याचे उघडकीस येईल त्या खातेदारांवर प्राप्तिकर विभाग कडक कारवाई करणार असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

कसे तपासणार काळे धन : प्राप्तिकर विभागाने ८ नोव्हेंबरपासूनच मराठवाड्यातील १ लाख ७५ हजार प्राप्तिकरदात्यांच्या बँक खात्यांवर बारीक नजर ठेवून त्या सर्व खात्यांची कुंडली सरकारजमा केली.नोटबंदीनंतर तब्बल ५१ दिवस कोणतीही खाती तपासण्याचे आदेश दिल्लीतील मुख्यालयातून आले नव्हते. आता तसे आदेश आल्याने प्रत्येक खातेदाराचा पगार अथवा व्यावसायिक असल्यास त्याची मासिक प्राप्ती याच्या गुणोत्तरात काळा पैसा कसा आला, हे ठरवले जाईल. प्रत्येक खात्याचा बारकाईने अभ्यास करून प्राप्तिकर विभागाची कारणे दाखवा नोटीस आल्यावर जास्तीचे आलेले पैसे म्हणजे काळा पैसा कसा नाही, हे सिद्ध करावे लागेल.

हिशेब दिला नाही तर...? : आपल्या खात्यावर आलेल्या जादा पैशाचा ताळेबंद सादर करता आला नाही तर ही रक्कम काळा पैसा गृहीत धरून त्यावर मोठा कर अाकारला जाऊ शकतो.

छापेमारीकडे दुर्लक्ष
संपूर्ण देशभर प्राप्तिकर विभागाचे छापे सुरू असताना औरंगाबाद विभाग काळ्या पैशावर छापे टाकण्यात कमी पडला. याची नोंद दिल्ली दरबारी घेण्यात आली आहे. औरंगाबादच्या कार्यालयाअंतर्गत संपूर्ण मराठवाड्यातून १ लाख ७५ हजार खात्यांचा लेखाजोखा तपासा, असे आदेश दिल्लीतील मुख्यालयातून आल्याने ही मोहीम जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
 
 
बातम्या आणखी आहेत...