आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीयीकृत बँकांत २४ हजार, तर खासगीत मिळाले १० हजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तीन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र एसबीआय आणि महाराष्ट्र बँकेतच २४ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले. एसबीएचने बारा हजार रुपयांचे वितरण केले. दरम्यान एसबीएचच्या ग्रामीण भागातील करन्सी चेस्टकरिता आरबीआयकडून शंभर कोटींचा पतपुरवठा करण्यात आला आहे.
सकाळपासूनच लोकांनी बँकेत रांगा लावल्या होत्या. सिडकोतल्या एसबीएच शाखेत दहा हजार रुपयांचे वितरण करण्यात आले. व्यवस्थापक माधव दातार यांनी सांगितले की बँकेला आवश्यक रकमेचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यानुसार वितरण करण्यात आले आहे. तर बळीराम पाटील येथील एसबीएचमध्येही बारा हजार रुपये वितरित करण्यात आले. एसबीएचचे मुख्य प्रबंधक रमेश भालेराव यांनी सांगितले की करन्सी चेस्टकडून दुपारनंतर बँकाना रक्कम प्राप्त झाली. त्यामुळे सुरुवातीला बँकांकडील रक्कम ग्राहकांना देण्यात आली. बुधवारी एसबीएचकडूनदेखील २४ हजार रुपये दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दहादिवसांनंतर महाबँकेने दिले २४ हजार : गेल्याकाही दिवसापासून केवळ दोन हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत वितरण करण्याऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रने मंगळवारी २४ हजार रुपयांचे वितरण केले. शहरातील झोनल ऑफिस, शहागंजसह सर्वच शाखांत २४ हजारांचे वितरण करण्यात आले. नोटाबंदीनंतर आत्तापर्यंत केवळ एसबीआयनेच २४ हजार रुपयांचे वितरण कायम ठेवले आहे. खासगी बँकात दहा हजार रुपयांपर्यंत वितरण झाले. अॅक्सिस बँकेच्या शाखांजवळील सर्व एटीएमवर दोन हजार, पाचशे आणि शंभराच्या नोटा मिळत होत्या.

सीडीएममध्ये पैसे भरताच पैसे बाहेर : एस.बी.आयचेसर्वाधिक सीडीएम आहेत. शहरातल्या आठ सीडीएमवर मंगळवारी अडचण आली. पैसे भरणा केल्यानंतर सर्व प्रोसेस होऊन त्या बाहेर येत होत्या. कॅश ओव्हरलोड झाल्यामुळे सीडीएममध्ये ही समस्या उद्भवली.

५० कोटींचे वितरण : प्रमुखबँकांसह खासगी बँकांकडून दिवसभरात साधारण ५० ते ६० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आल्याची माहिती एस.बी.एच.च्या स्टाफ असोसिएशनचे उपमहासचिव रवी धामणगावकर यांनी दिली. बँक ऑफ महाराष्ट्रने २४ हजार रुपयांचे वितरण केले असून. आगामी आठवडाभर ही रक्कम पुरेसी आहे. त्यामुळे आठवडाभर बँकाचा ताण कमी होईल, असे महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले.

ग्रामीणभागासाठी १०० कोटी : एसबीएचच्यासिल्लोड, कन्नड, पैठण, वैजापूर, गंगापूर या तालुक्यांतील शाखांसाठी आरबीआयने १०० कोटी दिले आहेत. प्रत्येक तालुक्याला २० कोटींची रक्कम प्राप्त झाली. आरबीआयकडून मिळालेली रक्कम करन्सी चेस्टला प्राप्त होते. शहरात एसबीआय,एसबीएच, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँकेच्या करन्सी चेस्ट आहेत. शहरात लागणाऱ्या बँकांना ती रक्कम दिली जाते.

आजही देणार २४ हजार
राष्ट्रीयीकृत बँकांत बुधवारीही २४ हजार रुपये मिळणार आहेत. मंगळवारी शहरातील ४० टक्के एटीएम होते. यामध्ये एसबीआयचे सर्वाधिक एटीएम सुरू होते. बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम गेल्या आठवडाभरापासून सुरू झाले नाहीत. एसबीएचने संध्याकाळनंतर एटीएममध्ये रक्कम भरण्यास सुरुवात केली होती.
बातम्या आणखी आहेत...