आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादसाठी ३२०७ कोटी द्या, बँकांचे आरबीआयला पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहर आणि जिल्ह्यातील बँकांमधील नोटा संपल्या असून डिसेंबरच्या एक आणि सात तारखेला शासकीय, निमशासकीय, कंपन्या, शिक्षण संस्था आणि पेन्शन देण्यासाठी बँकांत रक्कम शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे प्रमुख बँकांपैकी स्टेट बँक आॅफ इंडियाने १५०० कोटींची आणि स्टेट बँक आॅफ हैदराबादने ९०७ यासह अन्य बँकांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ३२०७ कोटी रुपयांची मागणी केली आहे, अशी माहिती बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
एसबीयआयनेकेली १५०० कोटींची मागणी : बँकांकडेसध्या असलेली रक्कम संपत आली आहे. त्यामुळे शहरातल्या करन्सी चेस्ट असलेल्या प्रमुख एसबीआय, एसबीएच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांनी आरबीआयकडे कॅशसाठी इंडेन पाठवले आहे. यामध्ये ३२०७ कोटी रुपये औरंगाबादसाठी यावेत, असे या पत्रांत म्हटले आहे. एकट्या एसबीआयने १५०० कोटी, एसबीएच ९०७ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र ४०० कोटी आणि आयडीबीआयने ४०० कोटींची मागणी केली आहे.

शनिवार आणि रविवारी सुटी असल्यामुळे बँकांना जास्तीच्या कॅशची गरज लागली नाही. मात्र, मंगळवारपर्यंत रक्कम उपलब्ध नसल्यास बँकांत अडचणीची स्थिती निर्माण होऊन ग्राहकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे आरबीआयला कोणत्याही परिस्थित रक्कम उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. अर्थात, बँकांनी जेवढे इंडेन पाठवले तेवढ्याचा पुरवठा नोटांच्या अडचणीमुळे केला जात नाही. मात्र, ही रक्कम प्राप्त झाल्यास जिल्ह्यात दोन आठवडे अडचण येणार नसल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.

कॅश आल्यास अडचण
^बँकांमध्ये सध्या असलेली कॅश संपत चालली आहे. त्यामुळे मंगळवारपर्यंत आरबीआयकडून कॅश येणे अपेक्षित आहे. मंगळवारपर्यंत ही कॅश बँकांना नाही आल्यास बँकेत बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. देविदासतुळजापूरकर, अध्यक्ष, बेट्रा.

पॉस मशीनमुळे गर्दी कमी
^एसबीआयने ४५ पेट्रोल पंपांवर पॉस मशीन बसवल्या आहेत. यामधून दोन हजार रुपये काढता येतात. यामध्ये बँकांकडूनन पंपचालकांना एका वेळी ५० हजार इतकी रक्कम दिली जात आहे. त्यामुळे बँकांवरील ताण कमी झाला आहे. रवींद्रपाटील, एजीएम, एसबीआय.

का केली मागणी?
शहरातील करन्सी चेस्टमध्ये असलेले पैसे संपत आहेत. शहरात बँकांच्या ४०० शाखा तसेच ७०० एटीएम आहेत. त्यातच आता डिसेंबर महिना सुरू होणार असल्यामुळे सरकारी कर्मचारी, कामगार, खासगी संस्थांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन देण्यासाठी ही रक्कम पहिल्या आठवड्यात लागणार आहे. परिणामी बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी होईल. त्यामुळे जिल्ह्यातल्या स्थितीचा आढावा अािण रोजच्या व्यवहाराला लागणारे पैसे याचा हिशेब करून नोटांची मागणी केली आहे.

आज पुन्हा एटीएममध्ये रक्कम भरणार...
शनिवारी रात्री एटीएम ड्राय होण्यास सुरुवात झाली होती. रविवारी सकाळी पुन्हा एटीएममध्ये रक्कम टाकण्यात येणार आहे. यामध्ये एसबीआयच्या एटीएमध्ये साधारण १५ कोटी रुपये भरले जाणार आहेत.

नोटांची प्रतीक्षा
एटीएममध्ये सध्या केवळ दोन हजार रुपयांच्याच नोटा मिळत आहेत. शंभरच्या नोटांचा तुटवडा असल्यामुळे खातेदार वाद घालत आहेत. त्यामुळे पाचशेच्या नोटांची प्रतीक्षा आहे.

२४ लाख क्ष्रमता एका एटीएमची
सध्या एटीएमध्ये २४ लाख रुपये इतकी रक्कम टाकली जात आहे. यामध्ये दोन हजारांच्या एक हजार नोटा असे २० लाख रुपये टाकले जात आहेत, तर शंभर रुपयांच्या हजार नोटा असे चार लाख रुपये टाकले जात आहेत. त्यामुळे एका एटीएममध्ये २४ लाख टाकले जातात. त्यानंतर साधारण १० ते १२ तास एटीएम सुरू राहते.

बातम्या आणखी आहेत...