आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: रावेरमध्ये बारागाड्यांच्या उत्सवात रोमांचक वळण; काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावेर- सुमारे ३०० वर्षापासून शहरात सुरु असलेली बारागाड्या ओढण्याची परंपरा आजही तेवढ्याच उत्साहात सुरु आहे. अक्षय तृतीय निमित्त शुक्रवारी शहरात मोठ्या उत्सहात बारागाड्या ओढण्यात उत्सव पार पडला. यावेळी अचानक शिवाजी चौकात रस्त्याच्या कडेला एका घराच्या कोपऱ्याला गाड्या धडकल्याने एकच गोधळ उडाला. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा क्षण होता. सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही. त्यानंतर गावकऱ्यांनी सर्व गाडे रस्त्यावर आणून ओढल्याने बारागाड्या उत्सव उत्साहात पार पडला. 

बाराड्या ओढण्याचे मुख्य भगत बाळू महाजन होते, तर त्यांचे बगले दीपक पाटील व कांतीलाल दानी हे होते. मंगरूळ दरवाजावरील मुंजोबाला आमत्रण दिल्यावर पूजन करून बारागाड्या ओढण्यास सुरुवात झाली. यावेळी शिवाजी चौकाच्या शेवटच्या टोकापर्यंत बरागाड्या आल्या. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घराच्या कोपरावरील दगडावर गाड्या अडकल्या. यावेळी मोठी खळबळ उडाली. मात्र, कोणतीही दुर्घटना घडली नाही. काही वेळ बारागाड्या थाबवून पुर्वस्थितीत आणण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा उत्सवास सुरूवात झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष व भाविकांची दुतर्फा गर्दी जमिली होती. पोलीस निरीक्षक कैलास काळे आणि त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

पुढील स्लाइडवर पाहा बारागाड्याचा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...