आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेड्यापाड्यात सारं...आता वाहतं आहे समतेचं वारं, असे होत आहे नागरिकांमध्ये प्रबोधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद व लातूर विभागात कार्यरत १७६ समतादूतांनी मे ते ऑक्टोबर या कालावधीत १३ हजार ६३६ कार्यक्रमातून तब्बल २४ लाख ग्रामस्थांना भारतीय राज्यघटनेत नमूद त्यांच्या हक्क, कर्तव्य आणि जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले आहे. तसेच अॅट्राॅसिटी व अंधश्रद्धाविषयी असलेले गैरसमज दूर केले आहे. आता बहुतांश गावातील विविध जाती,धर्माच्या लोकांत आजघडीला एकोपा निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे बार्टीचे "समतादूत' खऱ्या अर्थाने महापुरुषांचे समतेविषयीचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहाेचवण्यास सफल झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश गावात समता नांदतांना दिसत आहे.
पुणे येथील बार्टी संस्थेच्या वतीने समतादूतांच्या माध्यमातून राज्यभरात खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व भारतीय राज्य घटनेमधील नमूद न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व, समता व मूलभूत तत्त्वे जनसामान्यापर्यंत पोहाेचवण्याचे काम केले जात आहे. त्याशिवाय धार्मिक रूढी परंपरा, अंधश्रद्धा याविषयी प्रबोधन करण्यात येत आहे. त्यातच वर्षानुवर्ष चालत आलेल्या अंधश्रद्धा, रूढी व परंपरा आणि अॅट्राॅसिटी कायद्यासंदर्भात असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आता गावातील प्रत्येकाला "भारतीय राज्यघटना'ने दिलेल्या आपल्या हक्क, कर्तव्याची जाणीव झाल्याचे दिसून येत आहे.
आजघडीला औरंगाबाद विभागाअंतर्गत येणाऱ्या जालना, बीड, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यात १०२ व लातूर विभागातील उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात तब्बल ७४ असे संपूर्ण मराठवाड्यात तब्बल १७६ समतादूत कार्यरत आहेत. या समतादूतांनी मार्च ते ऑक्टोबर २०१५ पर्यंत मराठवाड्यात असलेल्या शहरी झोपडपट्टी, शासकीय व खासगी शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, रेल्वेस्थानक, रुग्णालय, यात्रेचे ठिकाण, प्रत्येक गावातील वस्त्यात राहणाऱ्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन १३ हजार ६३६ कार्यक्रमांच्या माध्यमातून समतादूतांनी तब्बल २३ लाख ७७ हजार ३७२ ग्रामस्थांचे "समाजप्रबोधन' केल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे गावा-गावात सारं... वाहतं आहे समतेचं वारं...असे म्हटले तरी वावगे ठरणार नसल्याचे दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कोणकोणत्या विषयावर दिली जाते महिती... काय आहेत आधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया...