आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड बायपास मृत्यूच्या दाढेतून काढण्यासाठी याचिका दाखल; उड्डाणपूल, समांतर रस्त्यांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद- एका महिन्यात किमान चार जणांचे बळी घेणाऱ्या बीड बायपास रस्त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. बायपासवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पूरक वळण रस्ते, बायपासला समांतर रस्ते (सर्व्हिस रोड), देवळाई चौकात उड्डाणपुलाची निर्मिती, सिडको बसस्थानक चौक ते बीड बायपास रस्ता, राष्ट्रीय महामार्ग आदींची कामे जलदगतीने हाती घेऊन ती पूर्ण करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली. न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे के. एल. वडणे यांनी १३ प्रतिवादींना नोटीस बजावून पुढील सुनावणी मे रोजी ठेवली आहे. या रस्त्यासंबंधी दिव्य मराठी आणि डीबी स्टार यांनी मालिका प्रसिद्ध केली होती. सातत्याने यासंबंधी पाठपुरावा करण्यात आला. याचिकेत बातम्यांची कात्रणे जोडली आहेत. महानुभाव आश्रम ते झाल्टा फाटा असा बीड बायपास ११ किमी लांब आहे. शहरातून जाणाऱ्या जालना स्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून हा पर्याय वाहनधारकांना देण्यात आला. शहराची व्याप्ती वाढल्याने बीड बायपास परिसरात सातारा देवळाई येथे मोठे गृहप्रकल्प निर्माण झाले. झालर क्षेत्राचा विकास २००८ पासून सिडकोने केल्यामुळे मधल्या काळात महापालिकेची हद्द सातारा-देवळाईपर्यंत वाढल्याने वाहनांची वर्दळही वाढली. जड वाहतुकीसह चाकरमान्यांच्या वाहनांची संख्याही वाढल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली. 

याचिकाकर्ते अॅड. शिवराज बाळासाहेब कडू यांनी पार्टी इन पर्सन याचिका दाखल केली आहे. १७ सप्टेंबर २०१६ रोजी देवळाई चौकात पैठण तालुक्यातील शेतकरी दांपत्याचा अंत झाला. अॅड. कडू यांनी प्रत्यक्ष अपघात पाहिल्यामुळे त्यांनी वरील विभागांना वेळोवेळी बायपासच्या प्रलंबित प्रश्नांची जाणीव करून दिली. परंतु प्रशासनाची दिरंगाई दैनंदिन होणारे अपघात यामुळे याचिका दाखल करणे भाग पडले. 

१३ विभाग प्रतिवादी 
याचिकेत महाराष्ट्र शासन, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी आैरंगाबाद, महापालिका आयुक्त, विभागीय व्यवस्थापक रेल्वे, मुख्य प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण, सिडको, पोलिस आयुक्त आैरंगाबाद, मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, विशेष भूसंपादन अधिकारी आदींना प्रतिवादी करण्यात आले आहे. 

कामांना गती द्यावी 
बीड बायपासचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे. यात झाल्टा ते महानुभाव आश्रमापर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अंतर्गत रस्ते प्रस्तावित आहेत. देवळाई चौकात चौरस उड्डाणपुलाचे नियोजन आहे. सिडको बसस्थानक चौक ते बीड बायपास या प्रस्तावित रस्त्याचा प्रकल्प अहवाल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्ली मुख्यालयाला सादर करण्यात आलेला आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. 

सायंकाळी सातत्याने वाहनांची हाेते कोंडी
या रस्त्याच्या दुतर्फा रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, लॉन्स, गृहप्रकल्प मंगल कार्यालये आहेत. सकाळी आणि सायंकाळी सातत्याने वाहनांची कोंडी होते. शिवाजीनगर रेल्वे गेट प्रत्येक अर्ध्या तासाला बंद होत असल्याने देवळाई चौकातील जड वाहनांची सुमारे एक किमीपर्यंत रांग लागते. धुळे-सोलापूर नवीन रस्ता गांधेली बाळापूर या गावांमधून जात असून, या रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे जड वाहतुकीस नवीन पर्याय उपलब्ध नाही. बीड बायपासला पर्याय नसल्याने महिन्याला ते जणांचा अपघाती मृत्यू होतो. 

सहा प्रमुख मागण्या आणि फायदे 
१) धुळे -सोलापूर वळण रस्ता पूर्ण करावा. यामुळे बीड, जालना, पैठण, नगर, धुळे, पुणे, नाशिककडून येणाऱ्या वाहतुकीचे नियमन होईल. 
२) देवळाईचौकात चौरस उड्डाणपुलाची निर्मिती केल्यास रेल्वे गेट शिवाजीनगर, देवळाई गाव, सातारा परिसर, महानुभाव आश्रम आदी भागांतून येणाऱ्या वाहतुकीस सुलभ होईल. 
३)सिडको बसस्थानक ते बीड बायपास रस्त्याच्या कामास गती दिल्यास शिवाजीनगर रेल्वे गेट संग्रामनगर उड्डाणपुलाकडील वाहतुकीची गर्दी कमी होण्यास मदत मिळेल. सिडको बसस्थानकाकडून बायपासला येण्यास मदत मिळेल. 
४) झाल्टाफाटा ते महानुभाव आश्रम दोन्ही बाजूंना अंतर्गत रस्ते खुले केल्यास छोट्या वाहनांना महामार्गावर जाण्याची गरज भासणार नाही. पर्यायाने अपघात टाळण्यास मदत मिळेल. 
५)तात्पुरत्या स्वरूपात अवजड वाहतूक इतर रस्त्यावरून वळवावी. हा पर्याय अमलात आणणे कठीण असले तरी अपघात रोखण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. 
६) देवळाईचौक येथे पाच वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी. यामुळे देवळाई चौकात होणारी कोंडी टळेल. 
बातम्या आणखी आहेत...