आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड बायपास मार्किंग: मुलाचे नगरसेवकपद जाण्याच्या भीतीने विनायक हिवाळे थंडावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस बंदाेबस्तात बीड बायपासवर मार्किंग करण्यात आले. - Divya Marathi
पोलिस बंदाेबस्तात बीड बायपासवर मार्किंग करण्यात आले.
औरंगाबाद- बीड बायपासचे रुंदीकरण तसेच सर्व्हिस रोडचे मार्किंग करण्यासाठी सोमवारी गेलेल्या पालिका पथकाशी हुज्जत घालून भाजप नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे यांचे वडील विनायकराव हिवाळे यांनी सोमवारी पळवून लावले होते. परंतु अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध केला तर मुलाचे नगरसेवकपद जाऊ शकते, याचा अंदाज आल्याने दुसऱ्या दिवशी हिवाळेंनी कोणताही विरोध करता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. तोपर्यंत पथकाने आरामात ‘हिवाळे लॉन्स’चे मार्किंग केले. हिवाळेंनी कोणताही विरोध केला नाही. मंगळवारी पालिका पथकाने ९० पेक्षा अधिक मालमत्तांवर मार्किंग केले. 

बीड बायपासवरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे येथील सर्व्हिस रोड मोकळा करा, असा जनरेटा वाढू लागला होता. त्यामुळे पालिका पथकाने जळगाव रोडवरील मोहिमेकडे दुर्लक्ष करून आपला मोर्चा बीड बायपासकडे वळवला. सध्या हा रोड १०० मीटरचा आहे. सर्व्हिस रोड मोकळा झाला तर हाच रस्ता २०० मीटर रुंद होईल आणि लहान वाहने मोठ्या रस्त्यावर येणार नाहीत म्हणून हा रस्ता मोकळा करण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. जिल्हा प्रशासनानेही त्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे तातडीने तेथे मार्किंग करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार सोमवारपासून मार्किंगला सुरुवात करण्यात आली. मात्र, विनायक हिवाळे यांनी आक्षेप घेत आधी भूसंपादन मोबदला द्या, इतर मोठ्या बांधकामांचे आधी मार्किंग करा, अशी भूमिका घेऊन पथकाला पिटाळून लावले होते. 
 
...तर नगरसेवकपद रद्द करण्याचे संकेत
पहिल्यादिवशी अपयश आले तरी मनपा प्रशासनाने हार मानली नव्हती. पुन्हा विरोध झाला तर अप्पासाहेब हिवाळे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे संकेत देण्यात आले होते. अतिक्रमणाच्या बाबतीत लोकप्रतिनिधी किंवा त्याच्या रक्ताच्या नात्यातील नातेवाइकाने विरोध केला तर पद रद्द केले जाते. त्यानुसार कारवाई करण्याची तयारी आयुक्त बकोरिया यांनी केली होती. त्या तयारीनेच आयुक्तांनी दुसऱ्या दिवशी पथकाला पाठवले. विरोध होताच तक्रार करा, असे सांगण्यात आले होते. 

नगरसेवक न्यायालयात, पथक 8 ला, तर संरक्षक 11 वाजता
लवकरातलवकर मार्किंग झाली म्हणजे रस्ता लवकर रुंद होईल म्हणून पालिका प्रशासनाचे पथक मार्किंगसाठी सकाळी 8 वाजताच बीड बायपासवर पोहोचले. पालिकेच्या दिमतीला असलेल्या पोलिस बळालाही ही वेळ देण्यात आली होती. परंतु पथकाने मार्किंग सुरू केली तरी पोलिसांचा पत्ता नव्हता. मार्किंग पथकाने बेंबडे रुग्णालय ते देवळाई चौक आणि देवळाई चौकापासून पुन्हा परतीचा मार्ग पकडला तरी पोलिस आले नव्हते. ११ वाजता पोलिस पथक दाखल झाले. तोपर्यंत ४० पेक्षा अधिक मालमत्तांचे मार्किंग झाले होते. आधी माहिती देऊनही जर पोलिस वेळेवर पोहोचले नाहीत, याचा अहवाल प्राप्त झाला तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त रवींद्र निकम यांनी सांगितले. बुधवारी सकाळी हे पथक पुन्हा तेथे दाखल होणार आहे. 
 
हिवाळेलॉन्सवर मंगळवारचा समारोप...
हिवाळेलॉन्सच्या मार्किंगला सोमवारी विनायक हिवाळे यांनी विरोध दर्शवला होता. मंगळवारी दक्षिणेकडून मार्किंग करण्यात आली. सायंकाळी हिवाळे लॉन्स येथे मार्किंग झाले. दिवसाच्या कामाचा समारोप तेथेच झाला. पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळे लॉन्सचा ते सव्वातीन मीटर भाग रस्त्यात येतो. म्हणजेच किमान १० फूट पक्के बांधकाम पाडावे लागणार आहे. 
 
सर्व्हिसरोडसाठी मोबदल्याची गरजच नाही...
भूसंपादनझाले नाही, मोबदला दिला नाही, असा युक्तिवाद मार्किंगला विरोध करण्याऱ्यांकडून झाला. मात्र, भूसंपादन विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व्हिस रोडच्या संपादनासाठी मोबदला देण्याची गरज नाही. मुख्य रस्त्यासाठी मात्र मोबदला द्यावा लागताे. कारण मोठा रस्ता हा सार्वजनिक वापराचा असताे. सर्व्हिस रोड हा त्या-त्या भागातील व्यावसायिक मालमत्ताधारकांच्या सोयीसाठी असतो. एखादे अधिकृत लेआऊट करताना त्यात लहान-मोठे रस्ते दाखवले जातात. बांधकामे झाल्यानंतर ते रस्ते आपोआप स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित होतात. त्यासाठी स्वराज्य संस्था मोबदला देत नाही. सर्व्हिस रोडसाठीही हाच नियम लागू होतो. जर सर्व्हिस रोडच नसेल तर तेथील मालमत्तांकडे जाणार कसे? सर्व्हिस रोडवर काहींनी बांधकामे केली आहेत. मोठ्या भूखंडाचे तुकडे पाडताना त्याची परवानगी घेता हे व्यवहार झाले आहेत. म्हणजे पहिलाच व्यवहार जर बेकायदेशीर असेल तर त्यापुढील सर्व व्यवहार आपोआपच बेकायदेशीर ठरतात. म्हणजेच आता जे कोणी स्वत:ला येथील मालक म्हणत आहेत ते मोबदला मागूच शकत नाहीत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. 
 
हिवाळेइतरांची हायकोर्टात धाव...
बीडबायपास रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी केल्या जाणाऱ्या मार्किंगच्या विरोधात विनायक हिवाळे, जावेद पटेल यांच्यासह सहा जणांनी अॅड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. याचिकेवर मंगळवारी (ता. १८) न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे न्यायमूर्ती के. एल. वडणे यांच्यासमोर सुनावणी झाली असता बुधवारी मालमत्तांचे बांधकाम परवाने खंडपीठात सादर करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना देण्यात आले आहेत. 

बीड बायपास मुळात तीस मीटर म्हणजे शंभर फुटांचा आहे. हा रस्ता दोनशे फुटांचा नाही किंवा दोनशे फूट रस्ता करण्यासाठी रीतसर भूसंपादन झालेले नाही. याचिकाकर्ते इतर या जमिनीचे मूळ मालक असून, त्यांनी व्यापारी संकुल दुकाने बांधली आहेत. त्यामुळे सदर जागेचे भूसंपादन होत नाही तोपर्यंत महापालिकेला ताबा घेण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद अॅड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांनी केला. याचिकेत महापालिका, जिल्हाधिकारी, राज्य शासन, जागतिक बँकेचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...