आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भद्रा मारुती संस्थानच्या वतीने श्रावण मासानिमित्त तयारी, बंदोबस्तात वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- श्रावण महिन्याला येत्या सोमवार, २४ जुलैपासून सुरुवात होत आहे. यानिमित्त येथील श्री भद्रा मारुती संस्थानच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. तसेच यानिमित्त भद्रा मारुती परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.   

यंदा श्रावण महिन्यात चार शनिवार आहेत. यामुळे भाविकांत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.  पोलिस अधीक्षक आरतीसिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली खुलताबाद पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांनी  ३ पोलिस निरीक्षक, २१ पोलिस उपनिरीक्षक, १७० पुरुष पोलिस कर्मचारी, ३० महिला पोलिस कर्मचारी, १ दंगाकाबू पथक, १ बाॅम्बशोधक पथक असा तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच गुन्हेशाखेचे पोलिस पथक साध्या वेशात तैनात असणार आहे. मंदिराशेजार पोलिस चौकी उभारण्यात येणार आहे.

जड वाहनांच्या वाहतुकीत बदल  
श्रावण महिन्यात औरंगाबादहून खुलताबादमार्गे कन्नडकडे जाणारी जड वाहनांची वाहतूक शरणापूर फाटा येथून माळीवाडा, कसाबखेडा मार्गे वेरूळ भोसले चौक येथून कन्नडकडे वळवण्यात आली आहे.  तर कन्नड व  खुलताबादहून औरंगाबादकडे जाणारी वाहने वेरूळच्या भोसले चौक येथून कसाबखेडा फाटा, माळीवाडा, शरणापूरमार्गे औरंगाबादकडे जातील.  फुलंब्रीकडून येणारी जड वाहने फुलंब्रीतून औरंगाबादकडे वळवण्यात येणार आहे.  

२५ सीसीटीव्ही कॅमेरे  
भद्रा मारुती मंदिरात १० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह मंदिर परिसरात एकूण २५ सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...