Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» News About Bid Bypass 12 To 4 Time Open For Heavy Vehicles

बीड बायपास १२ ते ४ वाजेपर्यंत जड वाहनांसाठी खुला, मे च्या पहिल्या आठवड्यात बायपास अतिक्रमण मुक्त

प्रतिनिधी | Apr 21, 2017, 07:14 AM IST

  • बीड बायपास १२ ते ४ वाजेपर्यंत जड वाहनांसाठी खुला, मे च्या पहिल्या आठवड्यात बायपास अतिक्रमण मुक्त
औरंगाबाद-बीड बायपासवरील अपघातांचे प्रमाण वाढल्याने पोलिस आयुक्तांनी या मार्गावरील जड वाहनांना सकाळी ७ ते रात्री ९ वाजे दरम्यान प्रवेशबंदी केली होती. मात्र, दिवसभर जड वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने दुपारी १२ ते ४ या वेळेत जड वाहनांसाठी हा मार्ग खुला करण्यात आला आहे. जड वाहतूक संघटनांनी गुरुवारी पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. या वेळी अध्यक्ष फय्याज खान, जयकुमार, ए. के मिश्रा, सुरेंद्रसिंग कासद अहमद आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, बीड बायपासच्या रुंदीकरणासाठी मनपाने मोजणी मार्किंगचे काम हाती घेतले अाहे. गुरुवारी मालमत्ताधारकांना नोटीस देऊन पंचनामा नंतर मार्किंगचे काम करण्यात आले. मे महिन्याच्या पहिल्या अाठवड्यात बीड बायपासवरील रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या मालमत्तांची पाडापाडी केली जाणार असल्याचे मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले. संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर तसेच कायदेशीर बाबी पूर्ण केल्याशिवाय भूसंपादन करू नये, असे आदेश न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे न्यायमूर्ती के. एल. वडणे यांनी बुधवारी (ता. १९) दिले होते. त्यामुळे पाडापाडीपूर्व सर्व कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

Next Article

Recommended