आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम आरक्षण मोर्चाच्या जनजागृतीसाठी दुचाकी रॅली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुस्लिम मूक मोर्चाच्या जनजागृतीसाठी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. यात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला - Divya Marathi
मुस्लिम मूक मोर्चाच्या जनजागृतीसाठी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. यात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला
औरंगाबाद - मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी जानेवारी रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या जनजागृतीसाठी रविवारी दुपारी १२ वाजता शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. मौलाना आझाद चौकातून रॅलीला सुरुवात झाली. 
 
या रॅलीच्या माध्यमातून मूक मोर्चात सहभागी होण्याचा संदेश देण्यात आला. रॅलीत तिरंगे झेंडे फडकवण्यात आले. रॅली आझाद चाैक मार्ग रोशन गेट, चंपा चौक, मिलकॉर्नर, बारापुल्ला गेट, मिलिंद कॉलेज, जयसिंगपुरा, मकई गेट, अासेफिया कॉलनी मार्गे आमखास मैदानावर येऊन विसर्जित करण्यात आली. दुसरी दुचाकी रॅली दुपारी तीन वाजता रोशन गेटपासून निघाली. रोशन गेट मार्गे ही रॅली सेंट्रल नाका, इंिदरानगर, नवाबपुरा, राजाबाजार, शहागंज, सराफा, सिटी चौक, जुना बाजार, भडकल गेट, मिल काॅर्नर, बस स्टँड, टाऊन हाॅलमार्गे आमखास मैदानावर वसर्जित झाली. तरुणांनी शिस्तबद्धपणे रॅली काढून मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. 
 
बातम्या आणखी आहेत...