आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता खा. खैरेंच्या वाढदिवसासाठी कार्यकर्त्यांच्या ‘चकटफू’ शुभेच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद शहरात ऊठसूट पोस्टरबाजी करून चमकोगिरी केली जाते. यात सर्वच पक्ष, संघटना, भक्तगण कोचिंग क्लासेसचा समावेश आहे. आता खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्तही अशीच पोस्टरबाजी करण्यात आली आहे. याशिवाय इतर पोस्टरही शहराचा ‘कचरा’ करत आहेत.
उड्डाणपूल, चौकांसह सर्वत्र अनधिकृत पोस्टरबाजी करून चकटफू शुभेच्छा देणारे शहर विद्रूप करणारे हे कार्यकर्ते संपूर्ण शहराला वेठीस धरत आहेत. मनपा आयुक्तांनी वाहतूक बेटांवर पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, क्रांती चौकासह गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट, मोंढा नाका गजानन महाराज मंदिर चौकात पोस्टरबाजांनी विद्रूपीकरण केले आहे.

वाढदिवसाचेनिमित्त
गुलमंडीसहऔरंगपुरा, पैठण गेट, क्रांती चौक, मोंढा नाका चौक इत्यादी ठिकाणी खासदार चंद्रकांत खैरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावून कार्यकर्त्यांनी पुन्हा चमकोगिरी केली आहे. मात्र, पोलिस मनपा याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत आहे.
पहिले पोस्टर गुलमंडीवरचे, तर दुसरे क्रांती चौकातील आहे. या दोन्ही पोस्टरमुळे वाहनधारकांना अडथळा होतो.

विद्यार्थी संघटनांचीही शोभा : तथाकथितविद्यार्थी संघटनांनीही शहरात विविध ठिकाणी पोस्टर्स चिकटवून शोभा वाढवली आहे. असे करून या संघटना विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवत आहेत, हे सांगण्याची गरज नाही.

यांनीहीचिकटवले पोस्टर : स्टुडंटफेडरेशन ऑफ इंडिया, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महासम्राट बळीराजा शेतकरी संघटना, शिवक्रांती युवा सेना, संभाजी सेना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यूथ रिपब्लिकन, दिव्य अमृतवाणी भक्ती सत्संग यांनी विविध कार्यक्रमांचे पोस्टर चिकटवलेले आहेत.