आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभ्रमाचे वातावरण : दानवेंच्या मध्यस्थीने घायाळांकडे एकनाथ कारखाना राहणार का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकच्या अतुल शुगर्सने चेअरमन तुषार शिसोदे यांच्याकडे प्रति कामगार १० हजार रुपयांचा चेक दिला. - Divya Marathi
नाशिकच्या अतुल शुगर्सने चेअरमन तुषार शिसोदे यांच्याकडे प्रति कामगार १० हजार रुपयांचा चेक दिला.
पैठण - संत एकनाथ सहकारी साखर कारखाना व सचिन घायाळ शुगर्स लिमिटेडचा करार या आठ दिवसांत संपुष्टात येण्याची शक्यता असून यावर  एकनाथच्या संचालकांची शनिवारी बैठक होऊन त्यात अंतिम निर्णय होणार आहे. असे असले तरी नाशिकच्या अतुल शुगर टेकने घायाळ व एकनाथमधील  करार संपुष्टात येण्यापूर्वीच एकनाथच्या कायमस्वरूपी असणाऱ्या कामगारांना १० हजारांची आगाऊ रक्कम दिली. यावरून तरी घायाळ व एकनाथचा १८ वर्षांचा करार संपुष्टात येईल हे स्पष्ट झाले आहे.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सचिन घायाळ कारखाना चालविण्यास तयार असले, तर मी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे बोलल्याने घायाळ की अतुल शुगर टेक यापैकी कोण, असा प्रश्न कामगारांना पडला आहे.   
आमदार भुमरे यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईत सचिन घायाळ यांना १८ वर्षे कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला. मात्र, आमदार भुमरे व घायाळ यांच्यात वाद झाल्याने कारखाना बंद पडला होता. आता तर घायाळ यांचे वडील विक्रम घायाळ हे  चेअरमन तुषार शिसोदे यांच्या संचालक मंडळात संचालक असतानाही एकनाथच्या संचालकांनी नाशिकच्या अतुल शुगर टेकशी हातमिळवणी केली आहे. 
 
यात घायाळ यांनी कराराच्या प्रश्नावरून आपण कोर्टात जाणार असल्याचे जाहीर केले आहे. यातून कारखाना सुरू होण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याचे दिसत असले तरी अतुल शुगर टेकने संत एकनाथशी करार होण्यापूर्वी प्रतिकामगार दहा हजारांची रक्कम दिली आहे. यावरून घायाळ यांच्या करारावर प्रश्न निर्माण झाला आहे.  
 
 शिसोदे यांची एकाकी लढत   :  कारखान्याचे चेअरमन तुषार शिसोदे  यांनी हा कारखाना यंदा कोणत्याही परिस्थितीत सुरू झाला पाहिजे यासाठी अनेक महिन्यांपासून  प्रयत्न करत असून त्यांच्या एकाकी प्रयत्नाला दानवेंचे बळ मिळते का हे पाहावे लागणार आहे. यातही कारखान्याच्या मशिनरी भंगार झाल्या असल्याने कारखाना सुरू करण्याचे आवाहन आहे.
 
आमदार भुमरे अलिप्त  
संत एकनाथ कारखाना सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या असल्या तरी व सचिन घायाळ शुगर्स लि. चा करार संपुष्टात येत असतानाही आमदार भुमरे यांची भूमिका अद्याप स्पष्ट नसून ते सध्या कारखान्याच्या प्रश्नापासून अलिप्त दिसत आहेत. यात चेअरमन तुषार शिसोदे यांनी हा कारखाना सुरू झाला पाहिजे यासाठी रावसाहेब दानवे यांची मदत घेताना दिसत असले तरी दानवे यांनी घायाळ यांना एक संधी द्यावी ही भूमिका घेतली असल्याने संत एकनाथच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह दिसत असून त्याचे बाॅयलर पेटल्यावर काय ते खरे, अशी परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळत आहे.  
 
अतुल शुगर्सने दिले कामगारांसाठी प्रत्येकी १० हजारांचे धनादेश
 
- कारखाना चालविण्यास तयार होतो.  मात्र, या संचालकांनी नाशिकच्या एका कंपनीला पुढे केल्याचे कळते. परंतु या नावाची नाशकात कोणतीही कंपनी नाही. हा काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार आहे. 
- सचिन घायाळ, 
चेअरमन, घायाळ शुगर्स  
 
कारखाना लवकरच सुरू होण्याचे संकेत
- नाशिकच्या अतुल शुगर टेकला हा कारखाना चालविण्यास देण्यात येणार आहे. त्यासंदर्भात शनिवारी संचालकांची बैठक होणार असून यात अंतिम फैसला होईल. मात्र, यंदा कारखाना सुरू करणारच आहोत.- तुषार शिसोदे, चेअरमन   
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...