आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोडाफोडीचे राजकारण BJP कार्यकर्त्यांनी शिकून घेतले पाहिजे, रावसाहेबांचे पुन्हा वादग्रस्त विधान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- राजकारणात यश मिळविण्यासाठी चिकाटीने काम करावे लागते, त्याच बरोबर इतर पक्षातील लोक आपल्याकडे आले पाहिजे यासाठी फोडाफोडीचे राजकारण भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिकून घेतले पाहिजे, असा कानमंत्रच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पैठण तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पैठण येथील भाजपच्या व्यापक बैठकीत दिला.
 
भाजप प्रदेशाध्यक्षांनी व्यापक बैठकीतच कार्यकर्त्यांना फोडाफोडीच्या राजकारणाचे धडे दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दानवेंचे हे भरसभेत वादग्रस्त वक्तव्य करण्याची पहिली वेळ नाही. याआधी त्यांनी जालना येथे शेतकऱ्यांना 'साले' म्हटल्याने राज्यभरातून रोष व्यक्त झाला होता. त्याआधी पैठणमध्येच त्यांनी नगरपालिका निवडणूकीत वादग्रस्त वक्तव्य केले होते.   
 
माजी आमदार किशनचंद तनवाणी, तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, आबा बरकसे यांच्या प्रमुख उपस्थित गावनिहाय भाजपच्या पदाधिकाऱ्यांची येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात बैठक झाली. यात रावसाहेब दानवे यांनी प्रत्येक गावात भाजपची शाखा याच बरोबर प्रत्येक जातीचे कार्यकर्ते आपल्या पक्षात आले पाहिजे, यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या,भाजपचे कार्य लोकांना जाऊन सांगा. आपली सत्ता असून त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे यासाठी बुथनिहाय कामाचा आढावा दानवे यांनी घेतला.  
बातम्या आणखी आहेत...