आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात दरराेज किमान पाच काेटी रुपये हाेताहेत काळ्याचे पांढरे!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तसेच जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी बँकांसमोर रांगा लागल्या आहेत. पण त्याचबरोबर दडवलेला ब्लॅक मनी व्हाइट करण्याची स्पर्धाही सुरू झाली आहे. लाख रुपयांच्या हजार, पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात सत्तर हजार रुपये मिळवून हा ब्लॅक मनी व्हाइट केला जात आहे. दिवसाला किमान पाच कोटी रुपये व्हाइट मनीत रूपांतरित केले जात आहेत. शहरात काही दलाल मंडळी या कामात सहभागी असल्याचे “दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत तसेच तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेतून उघड झाले आहे.
नोटा बदलून घेणाऱ्या लोकांच्या बोटांवर शाई लावण्याच्या निर्णयानंतर तर या मार्केटमध्ये अधिक तेजी आली अाहे. दलालांचे कमिशन ३० ते ४० टक्क्यांपर्यंत गेले आहे. सुरुवातीला ते २० टक्क्यांपर्यंत होते. आता ते ३५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. काही एजंट रिअल इस्टेटमध्ये काळा पैसा गुंतवून देण्यासाठी मदतही करत आहेत.


मिठात पीठ उघड होईलच
^काही मंडळीव्यापाऱ्यांना हाताशी धरून काळे धन पांढरे करण्याचा उद्योग करत आहेत. एक ते आठ नोव्हेंबर काळातील व्यवहाराच्या नोंदीवरून त्यांना ते कायद्याच्या चौकटीत राहून करणे शक्य होत आहे. मात्र, प्राप्तिकर विभाग एक ते आठ नोव्हेंबरच्या नोंदीवरच थांबता मागील काही महिन्यांतील नोंदीही तपासेल. त्यामुळे पिठात मीठ चालून जाते. मिठात पीठ लगेच उघड होईल. -उमेशशर्मा, सीए

कोठून येतात शंभरच्या नोटा
शहरात सर्वाधिक शंभरच्या नोटा जालना मालेगाव येथून आल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या हॉटेल, मोठी दुकाने, पेट्रोल पंप, पतसंस्था, मोबाइल स्टोअर्स आणि काही बँकांतून या नोटा येतात. या दुकान मालकांना या मोबदल्यात २० टक्के रक्कम अधिक मिळते. तर एजंट म्हणून काम करणाऱ्या लोकांना यात पाच टक्के मिळतात. हा व्यवहार एजंट रोज जागा बदलून करतात. फोनवर संपर्क साधण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलण्यावर अधिक भर देतात.

प्रतिनिधी : भाऊ,आमच्याकडे दोन लाख रुपयांच्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा आहेत. बदलून पाहिजेत.
एजंट: आम्हीहे काम करतो हे तुम्हाला कुणी सांगितलं?
प्रतिनिधी: आमच्याएका मित्राने तुमच्याकडून दोन दिवसांपूर्वी पैसे बदलून घेतले होते.
एजंट: ठीकआहे, करून देऊ. मात्र एक लाख दिले तर ६० हजार रुपये परत मिळतील. पटत असेल तर लगेच सांगा.
प्रतिनिधी: भाऊ,पण सध्या मार्केटमध्ये तर एकला ऐंशी असा रेट सुरू आहे ना ?
एजंट: कुठल्याजमान्यात आहात? तुमच्या मित्राने यापूर्वी बदलून घेतले ना.. त्यामुळे तुला अखेरचा भाव सांगतो. एक लाख रुपयांना ७० हजार रुपये घेऊन जा. विश्वास बसत नसेल तर पहिले नोटा पाहून घ्या, मग व्यवहार करा.
प्रतिनिधी: ओके भाऊ.. संध्याकाळी सांगतो.

या एजंटकडून जमा होणाऱ्या जुन्या नोटांचा हिशेब कसा दाखवता येईल याबाबत “दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने शहरातील काही चार्टर्ड अकाउंटंटसोबत चर्चा केली. यात असे स्पष्ट होते की, अनेक व्यापारी दर महिन्याला त्यांचे अकाउंट सेटल करतात. आठ नोव्हेंबरनंतर कुठलाही व्यापारी किंवा व्यावसायिक नियमानुसार हजार आणि पाचशेच्या नोटा घेऊ शकत नाही. मात्र नोव्हेंबरनंतर जमा होणाऱ्या नोटा आठ तारखेच्या आधीच्या बिलातील दाखवल्या जातील. साधारणत: एका मोठ्या व्यापाऱ्याची महिन्याची उलाढाल काही लाखांमध्ये असते. त्यामुळे त्यांना हा व्यवहार मागच्या तारखेत दाखवणे शक्य आहे. मात्र नव्याने व्यापार सुरू केलेल्या किंवा यापूर्वी एवढा व्यवहार खात्यात दाखवणाऱ्या व्यापाऱ्याला मात्र या पैशांबाबत विचारणा होऊ शकते. आडत दुकान किंवा ठोक व्यावसायिक, पेट्रोल पंप, हॉटेल अशा ठिकाणी भरपूर उलाढाल असते. सुट्टे पैसेही भरपूर असतात. मात्र नफा कमी असतो. अधिक नफ्याच्या अपेक्षेपोटी शंभरच्या किंवा सध्या चलनात असणाऱ्या नोटा बाजारात येऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...