आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXPOSE: बीएसएनएलच्या जिवावर खासगी कंपनीचा ‘हंगामा’, ग्राहकांची लूट, तपासा तुमचे बिल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लँडलाइन कनेक्शनवर स्कीमचे परस्पर अॅक्टिव्हेशन - Divya Marathi
लँडलाइन कनेक्शनवर स्कीमचे परस्पर अॅक्टिव्हेशन
बीएसएनएल लँडलाइन वापरणारे ग्राहक पुरते वैतागले आहेत. “हंगामा’ नावाची एक खासगी कंपनी लँडलाइन कनेक्शनवर परस्पर विविध गाण्यांच्या स्कीम अॅक्टिव्हेट करत असून त्यापायी बीएसएनएलकडून ग्राहकांवर तब्बल ४०० रुपयांपर्यंतचा भुर्दंड टाकला जात आहे. औरंगाबाद शहरामध्ये यासंदर्भात आतापर्यंत किमान १०० ग्राहक बीएसएनएलकडे आपले गाऱ्हाणे घेऊन गेले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यात अनेक शहरांमध्ये बीएसएनएलच्या जिवावर असा 'हंगामा' सुरु आहे. तेव्हा तुम्हीही तुमचे बीएसएनएल लँडलाइन बील एकदा तपासून पाहा!
 
म्यूझिक अॅक्टिव्हेशन या स्कीमच्या आडून औरंगाबाद शहरातील ग्राहकांकडून महिन्याला सरासरी ४० ते ५० हजार रुपये वसूल केले जात असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे या स्कीमचा नेमका लाभ काय आहे, हे ना ग्राहकांना माहिती आहे ना बीएसएनएलमधील अधिकाऱ्यांना! 

हंगामा या खासगी कंपनीने केंद्र शासनाच्या बीएसएनएल या टेलिकॉम कंपनीशी करार केलेला आहे. हंगामाकडून ग्राहकांच्या टेलिफोनवर गाण्यांच्या स्कीम अॅक्टिव्हेट करायच्या आणि त्यापोटी मिळणाऱ्या रकमेतून ४० टक्के रक्कम बीएसएनएल आणि ६० टक्के रकम हंगामा कंपनीला, असा हा करार आहे. ही कंपनी बीएसएनएलच्या लँडलाइन कनेक्शनवर गाण्यांच्या विविध स्कीम देऊन ग्राहकांच्या खिशाला हात घालत आहे. ग्राहकांच्या तक्रारींनुसार ही कंपनी परस्पर स्कीम अॅक्टिव्हेट करत आहे. मात्र, ग्राहकांना कॉल केल्यानंतर त्यांना आम्ही सर्व स्कीम समजावून सांगतो आणि त्यानंतरच म्हणजे त्यांच्याकडून होकार मिळाला तरच संबंधित स्कीम अॅक्टिव्हेट केली जाते, असा दावा बीएसएनएलने केला आहे. अर्थात, हा दावा ग्राहक अमान्य करतात. 

स्कीमचा लाभ काय, कुणालाच नाही माहिती 
दरम्यान, हंगामा कंपनीकडून परस्पर अॅक्टिव्हेशन झाले तरी या स्कीमचा नेमका लाभ काय आहे, हे अजूनही ग्राहक किंवा बीएसएनएलच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना माहिती नाही. यासंदर्भात बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना विचारले, तेव्हा त्यांनी ही स्कीम अॅक्टिव्हेट झाल्यावर ग्राहकांना कोणती सुविधा मिळते, हे माहिती नसल्याचे सांगून ज्याच्या टेलिफोनवर ही स्कीम अॅक्टिव्हेट झालीय, त्यांना विचारून पहा, असे सांगितले. त्यानंतर डीबी स्टार चमूने ज्यांच्या टेलिफोनवर ही स्कीम अॅक्टिव्हेट झाली, त्यांच्याशी संपर्क साधून विचारले असता त्यांनीही ही स्कीम नेमकी काय आहे, हे माहीतच नसल्याचे सांगितले. 
 
काय म्हणतात त्रस्त ग्राहक... 
सहा महिने पैसे भरले 
आमच्याटेलिफोनवर हीहंगामा स्कीम अॅक्टिव्हेट झाली होती. बरेच दिवस अशी काही स्कीम अॅक्टिव्हेट झाल्याचे कळले नाही. कळल्यानंतर मी बेगमपुऱ्यातील बीएसएनएल ऑफिसमध्ये अकाउंट विभागातील कर्मचाऱ्यांना भेटलो. माझा प्लॅन आठशे रुपयांचा होता, पण बाराशे रुपये बिल येऊ लागले. पुन्हा मी खोकडपुऱ्यातील बीएसएनएल आॅफिसला गेलो. अर्ज दिल्यानंतर दोन महिन्यांनंतर हा प्लॅन बंद केला गेला. मी सहा महिने या स्कीमची रक्कम भरत राहिलो.
-सुनील आढे, त्रस्तग्राहक 

होकार दिला तरच अॅक्टिव्हेट होते 
हीस्कीमपरस्पर अॅक्टिव्हेट केली जात नाही. हंगामा कंपनीकडून ग्राहकांना फोन केला जातो. स्कीमविषयी माहिती दिली जाते. जर ग्राहक किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने ही स्कीम अॅक्टिव्हेट करण्यास होकार दिला तरच ती अॅक्टिव्हेट होते. तक्रारी असल्यास ग्राहकांनी बीएसएनएलच्या अकाउंट ऑफिसरला भेटून तक्रार मांडावी.
-बी. एम. चिटणीस, जनसंपर्क अधिकारी, बीएसएनएल 

पुढील स्लाईडवर वाचा, पैसे देऊन लँडलाइनवर गाणे कोण ऐकेल? ... 
- सगळाच सावळा गोंधळ
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...