आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घडमोडेंचा कार्यकाळ संपण्याच्या मार्गावर, तरीही अंदाजपत्रक नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आर्थिक वर्षातील सहा महिने संपले. स्वत:चा महापौरपदाचा कार्यकाळ या महिनाअखेर संपतोय. तरीही विद्यमान आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक प्रशासन तसेच नगरसेवकांच्या हाती देण्यात भगवान घडमोडे यांना यश आले नाही. 

दरवर्षी साधारणपणे एप्रिलमध्ये, फार तर मे महिन्यात अंदाजपत्रक तयार होऊन नगरसेवकांच्या हाती पडत असे. त्यामुळे नवीन अंदाजपत्रकातील कामे तातडीने हाती घेतली जाऊ शकत होती. मात्र, यंदा निम्मे वर्ष संपले तरी अंदाजपत्रक तयार झालेले नाही. जूनपासून घडमोडे यांच्याकडे नगरसेवक वारंवार विचारणा करताहेत. त्यावर लवकरच देतो, असे त्यांचे उत्तर ठरलेले आहे. अंदाजपत्रकाचे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांची लेखा विभागातून बदली करण्यात आल्याने अंदाजपत्रकाचे काम थांबले होते. ही बाब समोर आल्यानंतर आयुक्तांनी त्या कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती पुन्हा लेखा विभागात केली. परंतु तरीही अजून अंदाजपत्रक तयार झालेले नाही. 

कामांनाफटका : अंदाजपत्रकातज्या कामांचा समावेश करण्यात आला आहे, ती कामे अधिकारी सुरू करू शकत नाहीत. अंदाजपत्रकातील तरतूद दाखवा, मगच निविदा प्रक्रिया किंवा अन्य कामे हाती घेतली जातील, असे वॉर्ड अधिकारी, अभियंते सांगतात. नियमानुसार जोपर्यंत अंदाजपत्रकात लेखाशीर्ष असत नाही, तोपर्यंत ते काम केले जाऊ शकत नाही. अंदाजपत्रक हाती पडेल तेव्हा नगरसेवक आपापल्या वॉर्डातील कामे पुढे करतील. निविदा प्रक्रियेपर्यंत काम येण्यासाठी किमान तीन महिने तरी लागतात. त्यानंतर कामे सुरू होऊ शकतात. म्हणजे नगरसेवकांच्या हाती पुढील कामांसाठी फक्त तीनच महिने असतील. 

सर्वच नगरसेवक एकदाच आमच्या कामाच्या निविदा काढा, असे म्हणत अधिकाऱ्यांच्या मागे लागतील. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कामाचा बोजा वाढणार नाही. अंदाजपत्रकातील सर्व कामे यंदा पूर्ण होणार नाहीतच. त्यामुळे या वर्षातील बहुतांश कामे पुढील वर्षात स्पिल ओव्हरमध्ये जातील. विलंबाचा हा मोठा फटका नगरसेवकांना बसणार हे पक्के आहे. 

प्रिंटिंग बाकी आहे 
अनेक कारणांमुळे अंदाजपत्रकास विलंब झाला; परंतु येत्या तीन दिवसांत ते नगरसेवकांच्या हाती असेल. सर्व झाले आहे. त्यावर शेवटचा हातही फिरवला आहे. आता फक्त प्रिंटिंग तेवढी बाकी आहे.
- भगवान घडमोडे, महापौर. 
बातम्या आणखी आहेत...