आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाणक्यपुरीत दिवसा घरफोडी, साडेचार लाखांचा ऐवज लंपास, स्थानिक नागरिकांमध्ये घबराट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - बीड शहरातील चाणक्यपुरी भागात मंगळवारी भरदुपारी चोरांनी घर फोडून चार लाख ६२ हजार रुपयांचा एेवज लांबवला. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुपारी साडेबारा वाजता हा चोरीचा प्रकार घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील चाणक्युपरी भागात विष्णू भागुराम निरडे यांचे घर असून ते जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेचे रेशन दुकान चालवतात. मंगळवारी दुपारी ते दुकानावर गेले होते, तर त्यांची पत्नी मुलगा हे दत्त जयंतीच्या निमित्ताने सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स भागातील स्वामी समर्थ मंदिरात गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश करत कपाटातील दीड लाख रुपये किमतीच्या दोन पाटल्या, ७० हजार रुपये किमतीचे गंठण, सव्वा लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या, ३७ हजार ५०० रुपयांच्या अंगठ्या रोख ७५ हजार रुपये असा चार लाख ६२ हजार रुपयांचा लांबवला. दरम्यान, निरडे यांच्या पत्नी दत्त जयंतीच्या कार्यक्रमाहून घरी परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पाेलिसांनी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण
घरफोडीनंतरठसेतज्ज्ञ श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले हाेते. श्वानाला चोरट्यांचा माग काढता आला नाही. ठसेतज्ज्ञांनी विविध ठिकाणांचे ठसे घेतले आहेत. बीड शहरातील गजबजलेल्या चाणक्यपुरी येथे झालेल्या घरफोडीने खळबळ उडाली आहे.

संशयितांची चौकशी सुरू
-घरफोडीचातपास सुरू असून संशयितांची चौकशी करण्यात येत आहे. श्वानाला माग काढता आलेला नाही. तपास चांगल्या पद्धतीने सुरू आहे.
-एस. बी. पठाण, सहायक पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर

दिवसाही हवी गस्त
शहरात रात्री विविध भागांत पोलिसांचे गस्ती पथक तैनात केलेले असते. परंतु, दिवसाही घरफोडीचे प्रकार शहरात होऊ लागले आहेत. बीट मार्शलची गस्तही शहराच्या विविध भागांमध्ये वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...