Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | news about bus service in nashik

शहर बससेवा सुरू करण्यासाठी पालिका सरसावली; अाज नेमणार कन्सल्टंट

प्रतिनिधी | Update - Oct 11, 2017, 09:44 AM IST

राज्य परिवहन महामंडळाने शहर बससेवा बंद करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर अाता महापालिकेने ही सेवा चालविण्याच्या पर्याया

  • news about bus service in nashik
    नाशिक- राज्य परिवहन महामंडळाने शहर बससेवा बंद करण्याची प्रक्रिया सुरु केल्यानंतर अाता महापालिकेने ही सेवा चालविण्याच्या पर्यायांची चाचपणी सुरू केली अाहे. यासाठी बुधवारी (दि. ११) कन्सल्टंटची नियुक्ती करण्यात येणार अाहे. भाडेतत्त्वावर, प्रायव्हेट पब्लीक पार्टनरशीप (पीपीपी) आणि स्वतः बससेवा चालविण्याबाबतच्या तीन पर्याय या निमित्त तपासले जातील असे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केले.

    पालिकेच्या वतीने बससेवा सुरु करण्याचा मुद्दा समाेर येताच विराेधाचा सुर अाळवला जाताे. परंतु सध्या एसटीकडून सुरू असलेली सेवा अाणि शहरातील खासगी वाहनांची संख्या लक्षात घेता ही सेवा पालिकेकडूनच मिळावी असे मत प्रवाशांकडून व्यक्त केले जात अाहे. त्यादृष्टीने पालिकेनेही अाता बससेवा चालविणे व्यवहार्य अाहे की नाही याची चाचपणी करण्यासाठी कन्संल्टंट नेमण्याची प्रक्रिया सुरु केली अाहे. बुधवारी कन्सल्टंटची नियुक्ती केली जाणार असल्याचे अायुक्तांनी स्पष्ट केले. कन्सल्टंट तीन महीन्यात पालिकेला अहवाल सादर करणार आहे. याबाबत पत्रकारांशी बाेलताना अायुक्त अभिषेक कृष्णा म्हणाले की, शहर बससेवा सुरू करण्यासंदर्भात पालिका सकारात्मक आहे. परंतु याकरीता तज्ञ सल्लागारांची नियुक्ती करून सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.

    कशा प्रकारे हीसेवा चालवावी लागेल. त्याचे मार्ग , तिकिटांचे दर यांचा अभ्यास करून समितीकडून येणाऱ्या अहवालानंतर निर्णय घेण्यात येईल. पालिकेच्या नागरिकांच्या हिताचाच निर्णय घेण्यात येईल. शहर बससेवा सुरू करायची की नाही एवढ्यापुरतेच सल्लागार संस्थेचे काम मर्यादित राहणार नाही तर सेवा सुरू करायची तर कुठल्या पद्धतीने करायची?, पब्लिक- प्रायव्हेट पार्टनरशिप, भाडेतत्त्वावर, की “एसटी’कडून सेवा ताब्यात घ्यायची याचाही सल्ला कंपनीमार्फत घेतला जाणार आहे.

Trending