आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसमतमध्ये व्यापाऱ्यांवर छापे, 3 कोटी जप्तीची चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्राप्तिकर विभागाने मराठवाडाभर  छापे टाकण्यास  सुरुवात केली असून सोमवारी ६ मार्च रोजी वसमत येथील तीन व्यापाऱ्यांची बँक खाती सील केली तर नांदेडमध्ये काही व्यापाऱ्यांचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांची सखोल चौकशी झाली मात्र यात अजून काळा पैसा बाहेर येण्यास काही दिवसांचा वेळ लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
१ मार्चपासून औरंगाबादेतील मुख्य प्राप्तिकर कार्यालयाची काळ्या पैशाची शोधमोहिम सुरु आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी औरंगाबाद, जालना,बीड येथून चार दिवसांत १३ कोटी रुपयांचा काळा पैसा जप्त केला. त्यापाठोपाठ सोमवारी ६ रोजी नांदेड विभागातील वसमत येथे तीन व्यापाऱ्यांच्या बँक खात्यांवरील व्यवहार संशयास्पद वाटल्याने त्याची खाती सील करुन ताब्यात घेतली आहेत. यात हळद व्यापारी, किराणा होलसेल व एक साखर व्यापारी यांचा समावेश आहे.
 
३ कोटी जप्तीची चर्चा
नांदेडात ३ कोटी रुपयाचा काळा पैसा पकडल्याची चर्चा सायंकाळी सातनंतर सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे मुख्य प्राप्तिकर आयुक्त व नांदेड येथील प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला नाही. काही व्यापाऱ्यांच्या व्यवहारांचा सर्व्हे मात्र साेमवारी झाल्याचे सांगितले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...