आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल चोरीच्या गुन्ह्याचा निकाल तब्बल २५ वर्षानंतर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- निमवाडी येथील दक्षता कॉलनीतील पोलिस वसाहतमधील पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगणातून २५ वर्षांपूर्वी सायकल चोरीला गेली होती. या प्रकरणाचा निकाल १३ फेब्रुवारी २०१७ ला लागला. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत त्याला १३ दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 

पोलिस कॉन्स्टेबल माेतीराम यांच्या अंगणातून ३१ ऑक्टोबर १९९१ रोजी सायंकाळी सव्वा सहा ते सात वाजताच्यादरम्यान सायकल चोरीला गेली होती. त्यांनी दोन दिवस चौकशी केली. तिसऱ्या दिवशी त्यांना एका सायकलच्या दुकानावर आरोपी राजू अवचितराव देशमुख हा चोरी गेलेल्या सायकलमध्ये हवा भरताना दिसून आला. त्याची विचारपूस केली असता त्याने कॉन्स्टेेबल मोतीराम यांच्या हाताला झटका देऊन पळ काढला होता.
 
 
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. न्यायालयात सोमवारी या प्रकरणाची अंतिम सुनावणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ननावरे यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३७९ अन्वये दोषी ठरवले असून, सदर गुन्ह्यासाठी १३ दिवस साध्या कारावासाची शिक्षा २०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम भरल्यास चार दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारपक्षाच्या वतीने अॅड. एम. के. ठोसर यांनी काम पाहिले. 

कारागृहात राहिल्याने शिक्षेत सूट 
आरोपी राजू अवचितराव देशमुख याला सिटी कोतवाली पोलिसांनी फेब्रुवारी रोजी अटक केली होती. तेव्हापासून आरोपी १३ फेब्रुवारीपर्यंत कारागृहात होता. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४२८ अन्वये आरोपी बंदी असलेला कालावधीचे १३ दिवस इतक्या शिक्षेची त्याला सूट देण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...