आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मेणबत्ती’ प्रकरणात आल्या ५०० वर तक्रारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मेणबत्ती उद्योगाचे आमिष दाखवून शहरातील नागरिकांना करोडो रुपयांचा चुना लावून पसार झालेल्या दांपत्याविरोधात गुरुवारपर्यंत ५४० जणांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या सर्व तक्रारींमधून कोटी ३६ लाख १६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहे. आरोपी पती-पत्नीचा शोध लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दोघे वापरत असलेल्या तिन्ही मोबाइल क्रमांकाच्या आधारे त्यांचा सध्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांनी सांगितले.
दहा दिवसांपूर्वी प्रशिक बनसोड (३०) त्याची पत्नी नेहा बनसोड (२५) यांनी हजारो कुटुंबांचे पैसे घेऊन पोबारा केल्यानंतर मेणबत्ती व्यवसाय घोटाळा समोर आला. यात दोन ते तीन हजार कुटुंबांची कोट्यवधी रुपयांची त्यांनी फसवणूक केली. १७ नोव्हेंबर रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात प्रथम गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र फसवणूक झालेल्या नागरिकांची संख्या आणि रकमेचा आकडा मोठा असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी पोलिस आयुक्तालयात ४० महिला आपला जवाब नोंदवण्यासाठी आल्या होत्या, अशी माहिती कोठाळे यांनी दिली. पुढील तपास ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोठाळे करत आहेत.

जप्तकार नेहाच्या भावाची : पोबाराकरण्यापूर्वी प्रशिक नेहाने ते वापरत असलेली कार शहरातच सोडून दिली. ही कार मुकुंदवाडी पोलिसांनी जप्त केली. काळ्या रंगाची अालिशान कार नेहाच्या भावाच्या नावावर असल्याचे कोठाळे यांनी सांगितले. तिच्या भावाचे गाव सायबर सेलने ट्रेस केलेल्या एका शहरांपैकी एक असल्याचेही समोर आले आहे.
अलिबागसह दोन ठिकाणी सुगावा
प्रशिक नेहा यांच्या मोबाइल क्रमांकावरून त्यांचा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले. आतापर्यंत दोघांच्याही मोबाइल क्रमांकावर आलेले करण्यात आलेल्या सर्वाधिक क्रमांकाची माहिती काढणे सुरू आहे. सायबर सेलकडून त्यांचे मोबाइल क्रमांक ट्रेस करण्यात आले. यात अलिबागसह दोन शहरांचा माग लागला.
आरोपी बनसोड दांपत्य.
बातम्या आणखी आहेत...