आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील उसाचे क्षेत्र दुपटीने वाढणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- जायकवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याखाली १,८३,३२२ हेक्टर शेती पाण्याखाली येते. परंतु मागील चार वर्षांपासून दुष्काळामुळे शेतीला पाणी मिळाले नसल्याने मराठवाड्यातील उसाचे क्षेत्र कमी झाले होते. परिणामी साखर कारखाने बंद पडले. मात्र, यंदा धरणाचा ८२ टक्के साठा झाल्यामुळे  शेतीला मुबलक पाणी मिळणार आहे. जायकवाडी धरणातून यंदा शेतीसाठी सात पाणी पाळ्या देण्यात येणार आहेत.  पहिल्या पाणी पाळीवर मराठवाड्यातील डाव्या कालव्याखालील औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यातील १४१६४० हेक्टर शेती ओलिताखाली आली असून या पाणी पाळीत मराठवाड्यात उसाची लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्याची माहिती कृषी विभागाने दिली. परंतु अद्याप उजव्या कालव्यातून पाण्याची मागणी न आल्याने त्यातून पाणी सोडले नाही. 
 
जायकवाडीतून रब्बीसह उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडले जाणार आहे. मात्र, याचे योग्य नियोजन पाटबंधारे विभाग करताना दिसत नाही, सात पाणी पाळीचे योग्य नियोजन झाले तर पीकवाढीबरोबरच पाण्याची बचत होईल. शिवाय दोन्ही कालव्यांची दुरुस्ती करण्याची गरज असून यातून शेतीला अधिक पाणी मिळू शकते. शिवाय ठिबकचा वापर करण्याचे बंधन करणे आवश्यक आहे. जायकवाडीतून रब्बी व उन्हाळी पिकासाठी पाणी  सोडले जात आहे. यावर पिकाचे क्षेत्र वाढले आहे, त्यात उसाचे क्षेत्र अधिक वाढल्याचे जायकवाडी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.

उन्हाळी पिकांना फायदा
सात पाणी पाळ्यांत रब्बीचे क्षेत्र ओलिताखाली येत अाहे.  उन्हाळी पिकांसाठी चार पाणी पाळ्या देण्यात येईल. याचा फायदा उसाला होईल. तसेच उन्हाळी पिकांची लागवडही वाढणार आहे.
 
बातम्या आणखी आहेत...